Friday, May 1, 2026

बच्चू कडू स्पष्टच बोलले ...म्हणाले...मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही,

वेध माझा ऑनलाईन।
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शेतकरी, दिव्यांगांसाठी लढाई लढणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे विलिनीकरण करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतली. पक्ष प्रवेशानंतर त्यांनी भूमिका मांडताना, आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम आहे. शेतकरी बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या कामांसाठीच आपण शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही, म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलं. 
बच्चू कडू यांनी विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्यादिवशीच रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दिव्यांग मंत्रालय, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करीत एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ही कामे मार्गी लागत आहेत, यापुढेही लॉगतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, मी भाजपसोबत मॅच होत नाही, या कडू यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

No comments:

Post a Comment