कराडच्या युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू पाटस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या गुरुवारी (10 मे ला) सकाळी 10 ते 3 या वेळेत आरोग्य तपासणी व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक व भाजप चे राज्याचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी दिली या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते होणार आहे
सदर कार्यक्रमात डी वाय एस पी राजश्री पाटील प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे तहसीलदार कल्पना ढवळे व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
गुरुवारी 14 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून या शिबिरास सुरुवात होईल यामध्ये होणाऱ्या आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी, दंत तपासणी, रक्तदाब, मधुमेह, तसेच सामान्य वैद्यकीय तपासणीसह आयुष्यमान कार्ड तसेच आभा कार्ड या आरोग्य सुविधांचा समावेश आहे या सर्व सुविधांचा आवश्यक लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
तसेच शासकीय योजनांमध्ये सेतू विभाग , पुरवठा विभाग,(रेशन),संजय गांधी शाखा विभाग, कामगार विभाग, एस टी महामंडळ विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व लोकोपयुक्त योजनांचा समावेश आहे याही सर्व योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे
युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने येत्या गुरुवारी (दि 14 मे रोजी) पार पडणाऱ्या
या शिबिराचे आयोजक युवा नेते सुदर्शन पाटसकर हे आहेत तर नगरसेविका तेजश्री पाटसकर यांची या शिबिराची संकल्पना आहे तर प्रतिष्ठांनचे अध्यक्ष विष्णू पाटसकर यांचे सदर शिबिरासाठी मार्गदर्शन लाभले आहे
तरी सर्वांनी या शिबिरांचा एकाच छत्राखाली लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सुदर्शन पाटसकर यांनी केले आहे
No comments:
Post a Comment