पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कराड ब्राम्हण महासंंघाच्या वतीने आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली रॅली काढून पोलीस अधीक्षक दराडे यांना निवेदन देण्यात आले.कराड मधील विविध संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ही घटना अत्यंत निंदनीय असून समाजमनाला हादरवणारी आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. सरकारने प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला असला, तरी न्याय प्रक्रियेत होणारा विलंब टाळून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात आणि महाराष्ट्र शासनाने "शक्ती कायदा" तात्काळ अंमलात आणून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
कराड मधील विविध संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला रोटरी क्लब ,लायन्स क्लब ,इनरव्हील क्लब, सकल हिंदू समाज, जीवन विद्या मिशन, रणरागिणी महिला संस्था, समस्त ब्राह्मण संघटना, आस्था संस्था ,आदिवासी कल्याण आश्रम , अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या
No comments:
Post a Comment