गेल्या 5 वर्षात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले उच्चांकी ऊसदर आम्ही दिला कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली अशा अनेकबाबी यशस्वीपणे करत आम्ही सभासदांना देखील सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील आम्ही कारखान्यात केलेलं आहे या व अशा बाबींमुळे कारखाना राज्यात अववल क्रमांकावर आहे त्यामुळे यावेळच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही मागच्या वेळेप्रमाणे वन-साइड निवडून येऊ... असा विश्वास डॉ सुरेश भोसले यांनी आज व्यक्त केला
आज गुरुवारी दुपारी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते यावेळी आमदार डॉ अतुल भोसले यांच्यासह कराडचे भाजपचे नगरसेवक आजी माजी पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी आमदार डॉ अतुल भोसले म्हणाले डॉ सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याची वेगळी अशी ओळख राज्यात निर्माण झाली आहे राज्यात साखर कारखानदारीत उच्चांकी दर देणारा आपला कारखाना आहे कृष्णा कारखान्याची राज्यात अव्वल साखर कारखाना म्हणून देखील ओळख आहे यावेळच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचा मोठा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत, जे कोणी कृष्णेच्या विजयात वाटेकरी राहण्यासाठी प्रयत्न करतील त्या सर्वांना कृष्णेच्या प्रवाहात सन्मानाने कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी देण्याचा आमचा मानस आहे सुरेशबाबांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलच्या विजयाची घौडदौड कायम राहणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला
No comments:
Post a Comment