Thursday, May 7, 2026

पालीचा खंडोबा देवस्थानचे मुख्य मानकरी देवराज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीची साथ सोडणार ?

वेध माझा ऑनलाईन।
पालीच्या खंडोबा देवस्थानचे मुख्य मानकरी व कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीची साथ सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.अशी सध्या चर्चा आहे  

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत नसल्याने निधी मिळण्यात अडचणी येणार, हे ओळखून पाल देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खासदार नितीन पाटील यांच्या समवेत झालेल्या स्नेह भोजनावेळी त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चाही झाली हे.असे समजते
2007-12 या काळात ते जिल्हा परिषद सदस्य आणि शिक्षण व अर्थ समितीचे सभापती होते. तसंच 2012-17 दरम्यान पहिली अडीच वर्षे त्यांनी कराड पंचायत समितीचे सभापती पद देखील भूषविले होते. 
सातारा जिल्हा परिषदेची यंदाची निवडणूक अनेक अर्थाने गाजली. यावेळी पाल देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांनी घड्याळ चिन्हावर लढूया, असा आग्रह धरला होता. मात्र, त्यांना  प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवारांच्या पक्षाला कराड तालुक्यात जिल्हा परिषदेची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. देवराज पाटील देखील पराभूत झाले.इ
दरम्यान लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं बोललं जातं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

देवराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे माजी काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांचे मामा आहेत.

No comments:

Post a Comment