राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर होत्या, या दौऱ्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. आता त्या विधानसभेच्या सदस्य बनल्या असल्याने त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
No comments:
Post a Comment