यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
यावेळी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलच्या नेत्या सौ. अर्चनाताई अविनाश मोहिते यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.
यावेळी माध्यमांशी बोलताना कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “संस्थापक पॅनेल पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले असून सभासदांच्या न्याय हक्कासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत. गेल्या अकरा वर्षांत कारखान्यात झालेल्या गलथान कारभाराविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. सरकार आणि निवडणूक यंत्रणेकडून ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक व्हावी, एवढीच अपेक्षा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पॅनेल प्रमुख सौ. अर्चनाताई मोहिते म्हणाल्या,
आम्ही ही निवडणूक सत्ता किंवा राजकारणासाठी लढवत नाही, तर शेतकरी सभासदांच्या घामाला योग्य दाम मिळाले पाहिजे यासाठी लढवत आहोत तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देखील आम्ही ही निवडणूक लढवत आहोत,
No comments:
Post a Comment