Wednesday, May 6, 2026

नसरापूर अत्याचार प्रकरण ; मृत्यूनंतरही नराधमाने चिमुकलीला सोडलं नाही! नराधमाने तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरात बुक्की मारल्याचंही वैद्यकीय अहवालात उघड ;

वेध माझा ऑनलाईन।
पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता या प्रकरणातून धक्कादायक माहिती उघड होत आहे. 

65 वर्षाच्या भीमराव कांबेळे या नराधमाने तोंड दाबून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा अमानुष अत्याचार केला होता. ज्या गोठ्यात तो गेली काही महिने राहत होता. तिथंच त्याने चिमुकलीला नरक यातना दिल्या. 
आरोपीने चिमुकलीच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार केल्याचं विच्छेदन अहवालात उघड झालं होतं. अशातच आता आणखी तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आलीये, 

चिमुकलीच्या छातीत जोरात बुक्की मारली...

तोंडाच पायमोजा कोंबल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला होता. पण खरंच ती मेली का हे तपासण्यासाठी नराधमाने असं काही केलं की, कुणी सामान्य वृत्तीचा माणूस विचारही करणार नाही. नराधमाने तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरात बुक्की मारल्याचंही वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे.


No comments:

Post a Comment