वेध माझा ऑनलाईन
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक महिलांनी तक्रारी दिल्या असून सध्या खरातची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत भोंदू खरात हा जादूटोणा करत असल्याचेही समोर आले होते. तसेच त्याने समता पतसंस्थेत मोठा आर्थिक गैर व्यवहार केल्याचे समोर आले होते. खरातचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते अशीही माहिती समोर आली होती. भोंदू खरातप्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतक त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. अशातच आता प्रतिभा चाकणकर यांना मोठा दणका बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भोंदूबाबा अशोक खरातने समता पतसंस्थेमधील खात्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल केल्याचे समोर आले होते. राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावाने असलेल्या चार खात्यांतून तब्बल 2 कोटी 40 लाखांची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. या सर्व खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी होता. याच प्रकरणाच्या तपासासाठी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यात प्रतिभा चाकणकर यांनी मुंबईतील झोन 2 च्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या चौकशीतून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment