Wednesday, May 6, 2026

सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार ?

महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्या खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज त्यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतीली असून राजीनामा सुपुर्द केला आहे. मात्र यानंतरच आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे.

4 मे 2026 रोजी बारामतीतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवला. या दणदणीत विजयानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे, म्हणून त्यांना खासदार हे पद सोडावं लागणार आहे. तर आता खासदार या पदावर छगन भुजबळ यांना जागा मिळणार का, या चर्चांनी जोर धरला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, याआधीही छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, त्यामुळे आता त्यांना ही रिक्त जागा मिळणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे

No comments:

Post a Comment