Monday, May 25, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न ; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी भवनात झाली.
सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन करताना सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पूर्णनिरीक्षण कार्यक्रम बाबत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावातील बुथवर मतदार यादी पूर्णनिरीक्षण काम फार बारकाईने करावे, आणि जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय व्हावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

प्रदेशाध्यक्ष मा.श्री शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित जनसंपर्क ठेवून संघटन वाढविण्यावर भर द्यावा, तसेच जनतेशी संपर्क वाढवा. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम पक्ष नेतृत्वाकडून आगामी काळात होईल, असे सांगून सक्षम विरोधक म्हणून यापुढे आक्रमक पद्धतीने जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असेही  प्रदेशाध्यक्ष मा.श्री शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सातारा जिल्हा विविध संघटनाच्या निवडी केल्या. यामध्ये प्रामुख्याने युवक अध्यक्षपदी समीर घाटगे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी सचिन जाधव, युवती अध्यक्षपदी कोमल घोरपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी शफिक शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्षपदी बाळासाहेब घोरपडे, वाहतूक विभाग सेलचे अध्यक्षपदी संजय पिसाळ, इतर मागासवर्गीय सेलचे अध्यक्षपदी अनिल लोहार तसेच कामगार सेलचे अध्यक्षपदी किरण राऊत यांच्या निवडी प्रामुख्याने केल्या तसेच काही जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी निवडी यावेळी झाल्या. उर्वरित निवडी येत्या आठ दिवसात करण्यात येणार आहेत असे बाळासाहेब पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. येऊ घातलेल्या सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत पक्षाने भूमिका घेण्याबाबत विषय मांडले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सौ.संगीता साळुंखे (माई), सौ.समिंद्रा जाधव, सौ.सुवर्णाताई पाटील, सतीश चव्हाण, नरेश देसाई, प्रवीण दसके, घनश्याम शिंदे, रमेश धायगुडे पाटील, ॲड.निलेश डेरे, संतोष पवार, नितीन शिंदे, गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, सचिन जाधव, शफिक शेख, सागर झणझणे, अनिल लोहार, शंभू खलाटे, समीर घाटगे, नंदकुमार मोरे, डॉ.सतीश बाबर, उमेश देशमुख, नलिनी जाधव, शैलजा कदम, पूजा काळे, कोमल घोरपडे, तेजस्विनी केसरकर, बाळासाहेब खलाटे, निलेश जगदाळे, बाळासाहेब फडतरे, पूजा बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment