वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्र राज्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा क्षेत्रांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज समोर आले असून बारामतीमध्ये राजकीय इतिहास झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला आहे आणि विजयाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय
पवार कुटुंबाचा अभेद्य गड समजल्या जाणाऱ्या बारामतीत सुनेत्रा पवार यांनी आपल्या पतीचा अनेक वर्षांचा जुना रेकॉर्ड संपुष्टात आणला आहे. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रतिस्पर्धी गोपीचंद पडळकर यांचा पराभव करताना १.६५ लाखांहून अधिक मताधिक्य मिळवले होते, जे त्यावेळी संपूर्ण राज्यासाठी एक उच्चांक होता.
मात्र, या पोटनिवडणुकीत बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. त्यांच्या नावे 2 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयाची नोंद झाली आहे, हे रेकॉर्ड झाले आहे.
No comments:
Post a Comment