Sunday, May 31, 2026

अतुलबाबा विरोधकांवर तुटून पडले ; म्हणाले...अविनाश मोहितेना विचारा... तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ? तुम्ही निर्दोष झालात का? कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावं लागत... ही नामुष्कीचं...

वेध माझा ऑनलाईन।
अविनाश मोहिते जेलमध्ये गेले... आणि आता जामिनावर बाहेर आहेत ...त्यांना विचारा तुम्ही निर्दोष झालात का?...तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ?...कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावं लागलं... ही नामुष्की पहिल्यांदाच पहावी लागली आहे...
कृष्णा कारखाना नाथा च्या पायथ्याशी आहे म्हणून या कारखान्यात बेईमानी चालत नाही नीतिमत्ता चांगली असली पाहिजे विरोधकांना भानगडी करताना ते लक्षातच आलं नाही आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं असा घणाघात आमदार डॉ अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्यावर केला 

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचा प्रचार शुभारंभ काल - शनिवारी  वडगाव हवेली येथे पार पडला त्याप्रसंगी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते  माजी चेअरमन मदनदादा मोहिते, डॉ सुरेश भोसले , जगदीश जगताप, रयत संघटनेचे धनाजी काटकर सर, व परिसरातील कार्यकर्ते सभासद  तसेच महिला, युवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ अतुलबाबा म्हणाले...
कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाची काळजी आत्ता त्यांना वाटतेय मग, तुमच्या पाच वर्षाच्या कालावधीत का शेतकऱ्याची काळजी केली नाही?... आपल्याला कारखाना चालवताना काही अडचण आली तर आपण तज्ञांचा सल्ला घेतो मात्र... आपले विरोधक देवरूषी बोलावतात... अंगारे धुपारे करतात... लिंबू टाचण्या कारखान्यावर फेकतात... असा कारखाना चालतो का?... अविनाश मोहिते हे साधे ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत...मग  त्यांना एवढ्या मोठ्या संस्थेचे काय कळणार? 
जेव्हा आपल्या हातात कारखाना आला तेव्हा आपल्याला कळलं की अविनाश मोहितेंनी कारखान्यात किती घोटाळा करून ठेवलाय... त्यावेळी कारखान्याची अर्थव्यवस्था बघणारे लोक यांचा कारभार बघून आपल्याला तेव्हा म्हणाले होते... की तोडणी वाहतूकीची रक्कम देण्यासाठी बँक तयार नाही... व्यापारी देणे झालेले द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत... अशी अवस्था करून या लोकांनी ठेवली होती... मी व सुरेश बाबांनी काही बँकांशी बोलणी केली तेव्हा अविनाश मोहितेंनी केलेल्या बोगस कर्जाच्या भानगडीच्या रकमेसकट पैसे आपल्याला भरायला लागणार होते... शेतकऱ्यांच्या घामाला दाम द्यायची भाषा आता हे लोक करत आहेत मग त्याचवेळी का नाही शेतकऱ्यांची काळजी केली ...? कारखान्याची अवस्था अशी का करून ठेवली? असा सवालही  आमदार भोसले यांनी केला
ते सध्या पाणीपट्टी कमी करण्याची व वीजबिल माफ करण्याच्या वलग्ना करत आहेत...हे सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये... या लोकाना शेतकरी सभासद नाकारणार असल्याने सभासदांना फसवण्यासाठी त्यांच्या या वलग्ना सुरू आहेत...

राजकारण विरहित असा सभासदांच्या हिताचा आपण नेहमीच कारभार केला आहे सहकारात नेहमीच एक न्यायाने आपले काम चालते त्यामुळे परिसरातील सर्वच राजकीय नेत्यांनी सुरेशबाबाना पाठिंबा दर्शवला आहे यावेळच्या कारखाना निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारीसाठी गर्दी होती...सगळ्यांना कारखान्यात संधी देणे शक्य नव्हते मात्र ज्यांना याठिकाणी संधी देता आली नाही, त्यांना इतर संस्थेत ऍडजस्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे  कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे  गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . 
मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला...

No comments:

Post a Comment