वेध माझा ऑनलाइन
कराड शहर पोलिसांनी 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण अंदाजे 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काही जण वारुंजी फाटा परिसरात इनोव्हा वाहनातून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत.
अशी माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.या कारवाईत समीर गुलाब शेख (रा. कोयनावसाहत, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा, कराड) या संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार 340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केले. तसेच तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली.
तसेच ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, हवालदार वाडकर, पाटील, कुंभार, महिला पोलीस सांळुखे, हवालदार स्वामी, कोरडे, सांडगे, मोरे, देशमुख, पवार, महिला पोलीस पिसाळ, हवालदार विभुते, चव्हाण, मोमीन, साळुंखे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
No comments:
Post a Comment