वेध माझा ऑनलाइन
: सोमवार पेठेतील नवीन पाण्याची टाकी परिसरातील श्री बाल गणेश मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली. मिरवणुकीदरम्यान मुला-मुलींनी सादर केलेल्या दानपट्टा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कन्याशाळा, चावडी चौक मार्गे पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक पुढे सरकत प्रीतीसंगम घाटावर पोहोचली. याठिकाणी भक्तिमय वातावरणात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.
दरम्यान, गणेश प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंतच्या कालावधीत श्री बाल गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यावर्षी दिपकदादा यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यावर्षी रक्तदान शिबिर, दंत तपासणी शिबीर, तसेच विविध आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते दीपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या कार्याला शिस्तबद्ध स्वरूप मिळाले असून, सामाजिक बांधिलकी जपत मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
दीपकदादा पाटील यांनी मंडळाची धुरा सांभाळल्यानंतर सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकी परिसरातुन सामाजिक आणि विधायक उपक्रमांना चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
दिपकदादा पाटील यांच्या रूपाने सोमवार पेठ पाण्याची टाकी परिसरात नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे त्यामुळे तेथील नागरिक आता आशावादी आहेत त्याठिकाणचे आत्तापर्यंत मरगळलेले राजकीय व सामाजिक वातावरण दिपकदादांच्या नेतृत्वामुळे पुन्हा प्रफुल्लित झाल्याचे दिसत आहे
दीपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या कार्याला शिस्तबद्ध स्वरूप मिळाले असून, सामाजिक बांधिलकी जपत मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकी परिसरातील युवकांना एकत्रित करून सामाजिक आणि विधायक उपक्रमांना चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनानंतर महाप्रसादाचे आयोजन मंडळाचे सदस्य आशुतोष पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील नागरिक व भाविकांनी घेतला.
भक्ती, सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि युवकांचा उत्साह यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या श्री बाल गणेश मंडळाच्या उपक्रमाचे व दीपक पाटील यांच्या नेतृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment