कोयना सहकारी बँक लि., कराडच्या उंब्रज शाखेचा नूतन जागेतील स्थलांतर समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कृष्णा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख व यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या शुभहस्ते झालेल्या या कार्यक्रमास आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, बँकेचे संस्थापक ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर), युवा नेते अदिराज पाटील, बँकेचे चेअरमन कृष्णत पाटील, व्हाईस चेअरमन साहेबराव शेवाळे यांच्यासह जि. प. सदस्य लालासाहेब जगदाळे, कोयना दूध संघाचे चेअरमन बाबुराव धोकटे, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, कराड खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, व्हा. चेअरमन सिद्धनाथ घराळ, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव इंगवले, मोहनराव माने, महेशकुमार जाधव, माजी सभापती एम जी भाऊ थोरात, संपतराव इंगवले, माजी जि. प. सदस्य सुदाम दीक्षित, पै आनंदराव मोहिते, रोहित पाटील, राजेंद्र पाटील, जालिंदर जगदाळे, सुरेश पाटील, सुरेश साळुंखे, पं. स. सदसया कोमल यादव, दिनकरआबा निगडीकर, उमेश साळुंखे, वैभव कदम, संभाजी जाधव, जयसिंग चव्हाण, रणजीत पाटील, निवासराव निकम, जयवंतनाना जाधव, माजी जि.प. सदस्य संपतराव जाधव, चंद्रकांत जाधव, नौशादभाई मुलांनी, चारेगावचे सरपंच गणेश माने, पै. पांडुरंग पाटील, वसंतराव पाटील, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोयना सहकारी बँकेच्या जडणघडणीत लोकनेते विलासकाका पाटील (उंडाळकर) यांचे मार्गदर्शन व योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या विचारातून आणि सहकाराच्या मूल्यांवर उभी राहिलेली बँक आज तीन दशकांच्या वाटचालीत सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर सातत्याने प्रगती करत आहे. संस्थापक अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली बँकेचा विस्तार व आधुनिकीकरणाचा प्रवास सुरू आहे. उंब्रज शाखेचे स्थलांतर हे बँकेच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल असून, नवीन जागेत ग्राहकांना अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. बदलत्या काळानुसार डिजिटल बँकिंग, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख सेवांना प्राधान्य देत बँकेने आपल्या कामकाजात सातत्याने सकारात्मक बदल केले आहेत.
यावेळी डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी कोयना बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. सहकाराच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत बँक करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. बँकेने आधुनिक बँकिंग सुविधांच्या माध्यमातून आपली सेवा अधिक व्यापक करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी कोयना बँकेच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार मनोज घोरपडे आणि आमदार धैर्यशील कदम यांनीही बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामीण व निमशहरी भागातील ग्राहकांना बँकिंगच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोयना बँकेने केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. बँकेने भविष्यातही ग्राहकसेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या माध्यमातून अधिक प्रगती करावी, अशा शुभेच्छा दोन्ही आमदारांनी व्यक्त केल्या.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी बँकेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानामुळे बँकेने आजचा टप्पा गाठल्याचे सांगितले. युवा नेते अदिराज पाटील यांनीही बँकेच्या आधुनिक विस्ताराच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बँकेचे चेअरमन कृष्णत पाटील यांनी बँकेच्या आगामी विकासाची दिशा स्पष्ट करताना ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक, गतिमान आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. व्हाईस चेअरमन साहेबराव शेवाळे यांनी उपस्थित मान्यवर, सभासद व ग्राहकांचे आभार मानले. उंब्रज परिसरातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी सहज व आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे. नवीन शाखेमुळे परिसरातील ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
समारंभाचे औचित्य साधून बँकेत ठेवी ठेवून बँकेवरील विश्वास दृढ करणाऱ्या ठेवीदारांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment