कराड चे आमदार अतुल भोसले यांनी अगोदरच कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणी केली आहेत त्यानंतर तुम्ही काँग्रेस पत्रकार परिषद घेऊन ही मागणी करत आहात तुम्हाला ही मागणी करायला उशीर झाला अस वाटत नाही का?
कारण , याचा एक टप्पा जरी जाहीर झाला असला, तरी दुसऱ्या टप्प्यात कराड चा समावेश दुष्काळी भाग म्हणून त्यात समाविष्ट होईल असा विश्वास अतुलबाबा यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे तुम्ही उशिरा ही मागणी करत आहात अस वाटत नाही का? या वेध माझा च्या प्रश्नावर काँग्रेसचे राज्याचे सचिव अजितअप्पा पाटील - चिखलीकर म्हणाले...अतुल बाबांच्या मागणीने कराडमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यास आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करू...आणि तसे झाले नाही तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू...
कराडच्या पाटण कॉलनीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी याविषयीची मागणी करणारी पत्रकार परिषद काँग्रेसचे अजितप्पा चिखलीकर यांनी आज बोलावली होती त्यावेळी ये बोलत होते शहराध्यक्ष ऍड ...उपस्थित होते
*अजितअप्पा पाटील पुढे म्हणाले*
कराड तालुक्यातील उत्तर भागातील 28 गावे तसेच पश्चिम भागातील 23 गावे तसेच कराड दक्षीण भाग पावसापासून वंचीत राहिला आहे जवळजवळ 45 दिवस पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळ सदृश स्थिती आहे जिल्ह्यातील मंत्र्यांनी आपापला तालुका वाटून घेत दुष्काळ जाहीर केला आहे आपल्या भागाला कोणी वाली नाही आपले आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिझी आहेत त्यामुळे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्याला दुष्काळी जाहीर करा अशी मागणी केली असल्याचे ते म्हणाले
दरम्यान राज्यातील युती सरकारच्या वतीने राज्यातील बहुतांशी भागाला दुष्काळी जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यात कराडच्या आमदार अतुल भोसले यांनीही दुसऱ्या टप्प्यात कराडमध्येही दुष्काळ जाहीर होईल असे संकेत दिल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणूनदिल्यावर
श्री पाटील म्हणाले... नुसते संकेत देऊन काय करायचंय...दुष्काळ जाहीर होईल तेव्हा बघू असे ते म्हणाले...तसे झाले तर आम्ही अतुलबाबांचे जाहीर अभिनंदन करू...आणि तसे नाही झाले...तर आम्ही आंदोलन करणार असल्याचेही पाटील म्हणाले...
No comments:
Post a Comment