Sunday, August 7, 2022

आज आणि उद्याचा दिवस पावसाचा ; काही जिल्ह्यात अलर्ट ; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जातेय. पावसाचं हे आक्राळविक्राळ रुप पुढच्या पाच दिवसांसाठी तसंच असू शकतं, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्याचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढताना दिसतोय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात पाऊस प्रचंड धुमाकूळ घालत आहे. कोकणात तर तो धुवाँधार कोसळत आहे. त्याचं हे कोसळणं आज आणि उद्या सारखंच असणार आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पाऊसही प्रचंड पडतोय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून ऑरेंज अलर्ट असणार आहे. याचा अर्थ पावसाचं प्रमाण काहीसं कमी होईल. पण पाऊस कोसळत राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र थोडीसी परिस्थिती वेगळी असणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्यासाठी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment