वेध माझा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला होता. ही बैठक सकाळपासून ते सायंकाळपर्यंत चालली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी 2047 साठी भारताचे लक्ष्य काय असावे, यासह अनेक विषयांवर भाष्य केले. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आता, याच बैठकीदरम्यानचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला असून, एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे योग्य नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार -
"एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आहेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!" असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment