वेध माझा ऑनलाइन - ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकारला येऊन महिना उलटून गेला आहे. तरी देखील अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर विरोधक सातत्याने टीका करत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावरुन शिंदे सरकावर हल्लाबोल केला होता. राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाकी खात्याचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहे. घटनेनुसार दोन मंत्र्यांचे सरकार बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस जास्तच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन महिना उलटून गेली तरीही राज्यात अजुनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे, अशी लक्षवेदना राज्यपालांकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफांसह इतर नेते उपस्थित होते. यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विदर्भ मराठवाडा मधील अतिवृष्टीमुळेहानी झाली आहे, त्यासाठी ताबडतोब मदत दिली पाहिजे. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. परंतु, मंत्रीमंडळ विस्तार होत नाही. सीएम आणि डिसीएमची उद्या वेळ मागितली आहे. केंद्राची टीम पाठवून पाहणी करावी अशी मागणी केली.
No comments:
Post a Comment