Wednesday, November 1, 2023

अजित पवार गटाच्या आमदारांची नौटंकी ? ...

वेध माझा ऑनलाइन। राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलने होत असताना आता मराठा आंदोलनाचे लोण मंत्रालयातही पोहोचले आहे. मंत्रालय परिसरात काही आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी या आमदारांनी घोषणाबाजी करून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी, त्यांनी मंत्रालयाला कुलूप लावत कोणत्याही मंत्र्याला मंत्रालयात जाऊ न देण्याची भूमिका घेतली होती. यावरून, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जोरदार टीका केली आहे. “मराठा मतांच्या लाचारीपोटी मंत्रालयाच्या दरवाजात बसून चाललेली नौटंकी बंद करा,” अश्या शब्दांत विकास लवांडे यांनी आमदारांवर टिका केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रालयाला कुलूप लावत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांमध्ये अमोल मिटकरी, चेतन तुपे, राहुल पाटील, बाळासाहेब पाटील, बाबाजानी दुर्रानी, बाबासाहेब आजबे, कैलास पाटील, विक्रम काळे, नीलेश लंके, राजू नवघरे, दिलीप बनकर, यशवंत माने आणि मोहन उबर्डे या आमदारांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment