Sunday, June 30, 2024


आ. गोरेंचा भ्रष्टाचार उघड होऊनही कारवाई नाही
मायणी मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी काढलेली कर्जे भागविण्यासाठी आमदार गोरेंना मेडिकल कॉलेजची भागीदारी देण्यात आली. मात्र, त्यांनी एक रुपयाचेही कर्ज भागविले नाही. उलट दुष्काळी भागात शून्यातून मेडिकल कॉलेज उभारणाऱ्या एम. आर. देशमुखांवरच ईडीने कारवाई केली. वास्तविक, कोरोना काळात आ. गोरेंनी केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड होऊनही त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही, असा आरोप दीपक देशमुख यांनी यापूर्वी केला होता.


... ईडीने केली होती अटक
मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सन २०१२-१३, १३-१४ व १४-१५ या तीन वर्षांतील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश न्यायालयाने अनियमित ठरवून २० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. तो दंड संस्थेकडून वसूल करण्याचे आदेशही शासनास दिले होते. तसेच मेडिकल कॉलेजमध्ये खोटी यंत्रसामुग्री खरेदी दाखवून मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांकडून मेडिकलच्या अ‍ॅडमिशनसाठी भरमसाठ पैसे घेतल्याप्रकरणी ईडीने तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुख यांना १० मे २०२२ रोजी अटक केली होती.


ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून ...सामनातून अजित पवारांवर टीका ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून बहिण- भावाच्या नात्यावरून अजित पवारांना डिवचलं आहे. सरकार कडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? असा सवाल करत सामनातून अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.

सामनाचा अग्रलेख
राज्याचा अर्थसंकल्प पोकळ असला तरी तिन्ही सत्तापक्ष हे आमचेच श्रेय म्हणत एकमेकांना लाथा घालत आहेत. या सर्व योजना जनहिताच्या आहेत, जनतेला थेट लाभ देणाऱ्या आहेत, असा या मंडळींचा कांगावा आहे. त्या खरोखर तशा आहेत का? त्याचा थेट लाभ जनतेला खरंच मिळणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी त्यावरून पोकळ खणखणाट सुरू आहे. मुळात अर्थसंकल्पातील असंख्य घोषणांची अवस्था ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी आहे. राज्यातील निम्म्या जिह्यांमध्ये अद्यापि पाऊस पडलेला नाही; परंतु अर्थसंकल्पात कोरडय़ा घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. थापांचा महापूर आणि खोटय़ा आश्वासनांची अतिवृष्टी करण्यात आली. याच खोटय़ा आणि जुमलेबाज आश्वासनांच्या फुग्यांमध्ये श्रेयाची हवा भरण्याचे उद्योग सत्तापक्षांमध्ये सुरू आहेत.

मागील अडीच वर्षे राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’चा या सरकारला विसर पडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना अचानक बहिणींची उचकी लागली. त्यातूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या- नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करीत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करीत आहेत. त्या भावांना तर सरकारने वाऱ्यावरच सोडले आहे. तरीही बहिणींच्या नावाने ही जुमलेबाजी करण्याचे धाडस सत्ताधारी करीत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? हा प्रश्न आहे. पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची ‘फुंकर’ भगिनींना कितपत दिलासा देईल? हाही प्रश्न आहेच. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत. लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे ‘अनाथ’ करणार आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे. असं म्हणत सामनातून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्यासोबत घडली होती धक्कादायक घटना !काय आहे बातमी:

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

दोन बेवड्यांनी रुपाली पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी आरडोओरडा केल्यावर आणि ठणकावून जाब विचारल्यावर दोन बेवड्यांनी पळ काढला.

रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट ? 
अत्यंत भयाण प्रसंग होता कालचा. सायंकाळी 7 ते 7.30 वेळ भोर येथील पिसावरे या गावात आमचे बंधू आण्णा बांदल यांच्या घराची वास्तुशांतीसाठी निघाले. मनीषाताई कावेडिया ,पूनम गुंजाळ सोबत होत्या. भोर मधून नांद या गावाकडचा मधला रस्ता हा अत्यंत शांत आणि छोटे रस्ते आम्ही ज्या दिशेला जात होतो त्या विरुद्ध दिशेने टू व्हीलरवर दोन एसम गाडीला किक मारत होते.ते फुल प्यालेले होते. आम्ही आपलं पुढे निघालो महिला पाहून ते गाडीचा पाठलाग करत आमच्या मागे मागे जवळ जवळ दीड ते दोन किलोमीटर आले. ते मागे येतात हे समजताच, गाडी थांबवू नको, रस्त्यावर कोणी नाही असे मनिषाला सांगितले. व्हीलरची लाईट बंद करून हे दोन बेवडे गाडीच्या मागे येऊन टू व्हीलर आडवी घातली. महिला आहे हे दिसत असताना सुद्धा एका माणूस डायरेक्ट अंगावर आला

तेव्हा तातडीने मी गाडीतून उतरून त्याला जाब विचारायला सुरुवात केली. दोघे पूर्ण नशेतच होते मग डायरेक्ट आरडाओरडा सुर केला आणि काढ ती बंदूक असे म्हणाले तेव्हा कुठे बेवडा स्थिर झाला. त्यानंतर त्याला माझी ओळख कळली. मग रूपालीताई पाटील ठोंबरे आहेत म्हंटल्यावर त्याने तिथून पळ काढला. हे घडल्यावर क्षणभर मनात विचार आला माझ्या जागेवर जर इतर कोणी महिला असत्या तर या दोन बेवड्यांनी काय केलं असतं याचा विचार न केलेला बरं. एखादा मोठा गुन्हा नक्कीच घडला असता हे असे दारू पिऊन जी विकृत लोक फिरतात नशेत गुन्हे करतात यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे यांच्यावर कठोर कारवाई करणे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. दारू पिऊन रस्त्यावर अशा पद्धतीने महिलांना, लोकांना त्रास होईल असे वागणे आणि यातूनच गुन्हे घडणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे यांच्यावर आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे यांना कायद्याची भीती बसणे सुद्धा गरजेची आहे

मी त्यानंतर गाडीतून कंट्रोलला फोन करून घडलेली घटना सांगितली त्याचा गाडीचा नंबर त्यांचा फोटो तोही पाठवला अशा घटना कुठल्याही सर्वसामान्य महिलेसोबत, लोकांसोबत घडू शकतो याच्यातून मोठा गुन्हा होऊ शकतो त्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे. बेवडे जाताना फोटो, गाडी नंबर फोटो काढला असल्या बेवड्या लोकांना सोडायचं नाही चंगच बांधला.
दारू पिऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे त्यातूनच गुन्हे घडण्यास हिंमत मिळते. माझ्या माता, भगिनी, मैत्रिणींनो सक्षम व्हा, प्रसंगातून युक्त्या वापरून आपले रक्षण करा आपली सुरक्षा,रक्षण आपल्यालाच करावे लागते. वेळ प्रसंगी काली, दुर्गा अवतार घ्यावाच लागतो म्हणून काल आम्ही महिला बचावलो.

माजी आमदारासह 16 नगरसेवक अजितदादांची साथ सोडणार ? शरद पवारांनी लावला सुरुंग ?

वेध माझा ऑनलाईन
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार  सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 नगरसेवकांनी  काल मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे  हे  शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. लांडेंच्या सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह 15 पदाधिकारी ही शरद पवारांच्या तालमीत परतण्याची शक्यता आहे. लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भोसरी विधानसभा विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. परंतु महाविकासआघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला की ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार, यावर पुढची भूमिका ठरणार आहे.
काल राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 नगरसेवकांनी मोदीबागेत शरद पवाराची भेट घेतली .काल संध्याकाळी ही भेट घेतली. दरम्यान आज पुन्हा हे 16 नगरसेवक शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. दुसरीकडे नेतेमंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत. तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत.  काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय घडामोडींनीही वेग आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

कोयना धरणात किती झालाय पाणीसाठा ?

वेध माझा ऑनलाइन।
रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नवजा येथे 55 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 73 आणि महाबळेश्वरला 54 मिलीमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 19.01 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे भुईमुगासह सोयाबीन आदी बियाणांची ठिकाणची पेरणीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत.पश्चिम भागात  पाऊस सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोयनेला ६९८ आणि महाबळेश्वर मध्ये ६५४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. 

शरद पवार म्हणाले...योग्यवेळी निवृत्तीचा विचार करायला हवा:काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दुसरा दिग्गज खेळाडू विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी सामन्यानंतर टी20 इंटरनॅशनलमधून निवृ्त्तीची घोषणा केली. त्यांच्या निवृत्तीच्या वृत्तावर काही क्रिकेट प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता दोघांच्या निवृत्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
योग्यवेळी निवृत्तीचा विचार करायला हवा. योग्यवेळी घेतलेली निवृत्ती योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत. ही गोष्ट चांगली आहे की, एका विशिष्ट काळानंतर आपला फॉर्म स्टॉप होऊ शकतो. त्याचवेळेला निवृत्तीचा निर्णय घेणं ती वेळ योग्य असते, असं शरद पवारांनी म्हटलंय.

योग्य निर्णय - शरद पवार
ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. आता सगळ्यांनी संधी मिळावी या हेतूने त्यांनी निवृत्ती घेतली. माझ्या मते त्यांनी योग्य निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे शरद पवार यांना उद्देशून राजकारणातून आता निवृत्त घ्यावी, असं म्हटलं होतं. पण दुसरीकडे शरद पवार निवृत्ती घेण्यास तयार नाहीत अशी यानिमित्ताने चर्चा आहे.



Saturday, June 29, 2024

रोहित शर्माची T20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन।
यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला. अतिशय रोमहर्षक आणि थरारक सामन्यात भारताने बाजी मारत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. एकीकडे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींना मोठं दुःख सुद्धा होत आहे. विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही T20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहितच्या निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.

अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला होता, “हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही मर्यादा ओलांडली याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय क्रिकेटला हा मोठा धक्का आहे.

शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी तीन संचालक गजाआड ;

वेध माझा ऑनलाइन
कराड शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तीन संशयित संचालकांना गजाआड केले असून याप्रकरणी अकरा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.यू. एल. जोशी यांनी फेटाळले आहेत. यापूर्वी या प्रकरणात दोन संचालकांना अटक झाली होती. त्यामुळे याप्रकरणी अटक झालेल्या संचालकांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी २८ जणांवर गुन्हा दाखल आहे. एप्रिल २०२४ मध्ये विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. उमेश वसंतराव मुंढेकर (वय ६६, रा. शनिवार पेठ), सतीश चंद्रकांत बेडके (वय ५४, रा. तेलीगल्ली, शनिवार पेठ), मनोज चंद्रकांत दुर्गवडे (वय ४२, रा. यशवंत हायस्कूल मागे, शनिवार पेठ, मूळ रा. मोरगिरी, ता. पाटण) यांना बुधवारी रात्री ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या तिघा संशयितांना दि. १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी याप्रकरणी शरद गौरीहर मुंढेकर आणि सुनील आनंदा काशीद या दोघांना अटक करण्यात आली होती.

अजिदादांच्या बजेटमध्ये सातारच्या पर्यटनासाठी 381 कोटी ,कराडला युवक कौशल्य प्रकल्प तरतूद; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ४३० खाटांचे रुग्णालय, कराड येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये युवक कौशल्य प्रकल्प, पश्चिम घाटाच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा असे महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

काल शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने याकडे सातारा जिल्ह्यासाठी कोणती तरतूद करण्यात येते?, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. यानुसार राज्यात सध्या या १ लाख लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर आहेत.
२०३५ पर्यंत ही संख्या १०० च्या वर नेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी १०० प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यात ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात साताराचाही समावेश करण्यात आला आहे.

३८१.५६ कोटीचा आराखडा...
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ३८१.५६ कोटी रुपये एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीक्षेत्र महाबळेश्वर विकास, प्रतापगड किल्ला जतन व सवंर्धन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन, कोयना व हेळवाक वनक्षेत्र अंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे.
उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार
ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पानंतर ५०० औद्योगिक संस्थांची दर्जा वाढ, मॉडेल, आयटीआय, जागतिक कौशल्यकेंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे नागपूरसह सातारा जिल्ह्यातील कराड येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स मान्यता देण्यात आली आहे.


उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवार काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात विधानसभा निवडणुकीला ३ महिने बाकी असतानाच महाविकास आघाडीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून वादविवाद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं धोक्याचे आहे. लोकांनी उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे, लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना पाहून मतदान केलं आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं. त्यामुळे खरंच तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याना विचारलं असता पवारांच्या उत्तराने सस्पेन्स आणखी वाढला आहे.

शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस संजय राऊतांनी केलेल्या विधानावरुन, “उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का?” असा थेट प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नावर शरद पवारांनी अगदी सावध आणि मोजक्या शब्दात उत्तर दिले. सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे, आमची आघाडी हाच आमचा समुदायिक चेहरा आहे. इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही असं म्हणत पवारांनी हा प्रश्न टोलवून दिला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असं पवार थेटपणे बोलले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे

शरद पवारांची बजेटवर टीका ...म्हणाले...खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार?

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र सरकारने काल 28 जून रोजी विधानभवनात आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून जनतेला खुश केलय. येत्या ३-४ महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मी काही नवखा नाही’, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. खिशात ७० रुपये असताना १०० रुपये खर्च कसे करणार? असा सवाल पवारांनी राज्य सरकारला केला आहे.

शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी शिंदे सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या मोठमोठ्या घोषनांबद्दल विचारलं असता, विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असा खोचक सवालही शरद पवार यांनी केला. खरं तर हा हा अर्थसंकल्प फुटला आहे. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होते असं पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्य सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदीच्या कामावर जनता खुश नाही, लोकसभेला जसा निकाल लागला त्याचप्रमाणे विधानसभेचं चित्र असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

Friday, June 28, 2024

अजितदादांनी सादर केलेल्या बजेटमध्ये कोणाला काय मिळाले? सविस्तर माहिती वाचा

वेध माझा ऑनलाइन ।
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये शेतकरी वर्ग, महिला, तरुण वर्ग तसेच इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यात सर्वात मोठी घोषणा ठरली ती ‘लाडकी बहीण योजना’ याद्वारे महिलांना दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. तसेच वारकऱ्यांसाठी देखील काही घोषणा करण्यात आल्यात. अर्थसंकल्पामध्ये कोणत्या  घटकाला काय मिळालं?, हे सविस्तर पाहुयात

महिलांसाठी कोणत्या घोषणा झाल्या?
– मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली.
– महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.
– मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ.
– गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
– राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील.
– ⁠बस प्रवासात सवलत.
– ⁠मुद्रांक शुल्कात सवलत.
– ⁠वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील.
– ⁠बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार निधी देण्यात येईल.
– ⁠यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे.

शेतकरी वर्गाला काय मिळाले?
-शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार.
– कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं अनुदान.
– ⁠गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार.
– येत्या दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील
– ⁠सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15,000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे
– ⁠3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे
– ⁠शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे
– ⁠मागेल त्याला सौरपंप दिला जाणार आहे.
– अभ्यासक्रम पुर्ण करणारे तरुण जास्त आहे.
– ⁠10 हजार रुपये विद्यावेतन दिल जाईल.
– संजय गांधी निराधार योजनेला 1 हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळालं.
– ⁠शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आलंय. यासोबतच वारकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

वारकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा
तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज प्रस्थान होत आहे. ⁠लाखो वारकरी आहेत प्रत्येकी वारीला 20 ⁠हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
– ⁠सर्व वारकरी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
– ⁠मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
– पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित.
– प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार

युवा वर्गासाठी विविध योजना
-मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना- दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन -दरवर्षी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च

-शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण
– जागतिक बॅंक सहाय्यित 2 हजार 307 कोटी रुपये किमतीचा ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास’ – 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ, मॉडेल आय.टी.आय, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण
– मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे, येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता
– पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड
– ‘स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी’ मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित – ग्रामीण भागात ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन – 15 ते 45 वयोगटातील १८ हजार ९८० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण
-आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) इत्यादी संस्थांमार्फत एकूण 2 लाख 51 हजार 393 विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण- 52 हजार 405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त
– संशोधन व नवउपक्रम केंद्रांसाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी असा एकूण १०० कोटी रुपयांचा निधी
– शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनांसाठी 100 कोटी रुपये निधीची तरतूद
– अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठीदेखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू
– इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60 हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता
– गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतीगृहे स्थापन करण्यास मंजूरी
– राज्यात सध्या असलेले 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टरचे प्रमाण सन 2035 पर्यंत हे प्रमाण 100 हून अधिक करण्यासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता
– मौजे सावर, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता , बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
– शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ
– थ्रस्ट सेक्टरमधे अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची गुतंवणुक- 50 हजार रोजगार निर्मिती
– हरित हायड्रोजन- २ लाख ११ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक- ५५ हजार ९०० रोजगार निर्मिती
– महापे, नवी मुंबई येथे 25 एकर जागेवर ‘इंडिया जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क’ नियोजित- 2 हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांचा समावेश-50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – एक लाख रोजगार निर्मिती
– एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028- पाच वर्षात 25 हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक-5 लाख रोजगार निर्मिती
– खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी लघु-वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार
– सिंधुदुर्ग जिल्हयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हींग केंद्र- 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित – 800 स्थानिकांना रोजगार

दुर्बल घटकांसाठी विविध योजना
– ‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्रय नाहीसे करणे’ हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय
– संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ- एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ – सन 2023-24 मध्ये 45 लाख 60 हजार लाभार्थींना 7 हजार 145 कोटी रुपये अनुदानाचे वाटप
-पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
– नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळांसाठी निधीची पुरेशी तरतूद
– दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ – पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरकुल बांधणार-
– दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनाचे वाटप करणार
– तृतीयपंथी धोरण-2024 जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ
-धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी खारघर, नवी मुंबई येथे 4 हजार चौरस मीटरचा भूखंड
– महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना
-मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरीता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये
– महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू
– आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये – एक हजार 900 रुग्णालयांमार्फत एक हजार 356 प्रकारचे उपचार उपलब्ध
– ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ३४७ ठिकाणी कार्यान्वित
– पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपये निधी
-प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक (Maharashtra Budget 2024) अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35 लाख 40 हजार 491 घरकुल बांधण्यात येणार
-सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांकरीता 7 हजार 425 कोटी रुपयांची तरतूद
– बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12 हजार 954 सदनिका वितरित-उर्वरित सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नियोजन
-सन 2024-25 साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 हजार 886 कोटी 84 लाख निधीची तरतूद


पुणे-हडपसर येथील घटनेचा कराडात निषेध; कराडच्या कोल्हापूर नाक्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने केला रास्ता रोको ; पोलिसांना दिले निवेदन;


वेध माझा ऑनलाइन ; हाडपसर पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध म्हणून आज कराडात सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती सकल हिंदू समाजाच्या वतीने यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले 

कराड शहरातील दत्त चौकातून शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून सदर मोर्चाची सुरुवात झाली हा मोर्चा दत्त चौकातून कोल्हापूर नाका येथे पोहोचला त्यानंतर त्याठिकाणी रास्ता रोको करण्यात आला यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता 
दरम्यान अशा घटना राज्यात होऊ नयेत यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या नराधमाला 10 वर्षे शिक्षेची तरतूद असावी असा कायदा करण्यात यावा पुन्हा असा प्रकार घडल्यास संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरेल पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीस अटक करून त्याच्यावर कडक करवाई करावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली
यावेळी जय भवानी-जय शिवाजी, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता...

दरम्यान आज निघालेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये माजी नगरसेवक अण्णा पावसकर विक्रम पावसकर जयवन्त पाटील सौरभ पाटील इंद्रजित गुजर हणमंत पवार हे देखील रस्त्यावर उतरलेले दिसले तसेच शहर व परिसरातील शेकडो युवक, महिला तसेच विविध हिंदू संघटना देखील या मोर्चात सहभागी झालेल्या दिसल्या

दरम्यान या मोर्चासाठी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करणारे अनेक व्हीडिओ कराडातील बऱ्याच जणांनी तयार करून सोशल मीडियावर टाकले होते त्यातील काहीजण या मोर्चात दिसले तर व्हीडिओ  करून काहीजण मात्र या मोर्चात स्वतः सहभागी झालेले दिसले नाहीत याची पत्रकारांच्यात चर्चा होती


Thursday, June 27, 2024

पुण्यातील "त्या' घटनेचा कराडच्या मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध ;पोलिसाना निवेदन;

वेध माझा ऑनलाइन।
हडपसर (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरच्या घटनेचा व संबंधित माथेफिरुचा कराड मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या विकृतावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रांतअधिकारी व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन न्यायाचे व समतेचे स्वराज्य निर्माण केले. म्हणून सर्वांच्याच मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदर व आपलेपणाची भावना आहे. मात्र विकृत विचारांच्या काही व्यक्ती समाजात अस्थिरता व अशांतता पुरवण्याच्या दुष्ट हेतूने समाजाच्या भावना पायदळी तुडवण्याचे दुष्कृत्य करु पहात आहेत. 

हडपसर येथील दुष्कृत्य करणारास कठोरात कठोर कारवाई करून आयुष्याची अद्दल घडवावी तसेच महापुरुषांचा अवमान किंवा विटंबना करणार्‍यांना किमान 10 वर्षे सकतमजुरीची शिक्षा देण्यात यावी.सदरचे खटले जलदगती न्यायालयात चालवले जावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बरकत पटवेकर, बशीर कारभारी, इम्तियाज बागवान, अहमद मोमीन, मोसम सय्यद, जाबीर वाईकर, इम्रान मुजावर, उमर फारुक सय्यद,  फिरोज मुजावर आदी उपस्थित होते.

हवामान खात्याचा अतिमुसळधारचा इशारा - कोणत्या जिल्ह्यात होणार अतिमुसळधार? ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन ते तीन दिवस या भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सिंधुदुर्गला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे.

पावसाचा सर्वाधिक जोर हा सह्याद्रीच्या खोऱ्यात पाहायला मिळत आहे. यामुळे कर्ली नदी, गडनदी, तेरेखोल नदी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आजही कोकणातील बऱ्याच भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.

Wednesday, June 26, 2024

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली ; रुग्णालयात केले दाखल;

वेध माझा ऑनलाइन।
माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. अडवाणी यांची वयोमानाच्या अस्वथतेमुळे प्रकृती निघड्ली होती. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना एम्सच्या हॉस्पिटलच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बातमी.....

निलेश लंकेनी घेतली गडकरींची भेट ; चर्चेला उधाण; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी मात्र इंग्रजीतून शपथ घेतली.त्यांच्या या अनोख्या स्टाईलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

आता निलेश लंकेचा सध्या एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी एकत्र दिसून येत आहेत. यात नितीन गडकरी यांनी निलेश लंकेंच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो आता चर्चेत आला आहे.

निलेश लंके यांचं ट्वीट चर्चेत
आज अधिवेशनानंतर खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. कोरोना काळात निलेश लंके यांच्या कामाचे भरपूर कौतुक झाले होते. तसेच रस्त्यासाठी जेव्हा लंके उपोषणाला बसले होते, तेव्हा नितीन गडकरी यांनी स्वत: त्यांना फोन केला होता.अशात ही दिल्लीतील भेट आता चर्चेत आली आहे.

“देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमूल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली, दिलखुलासपणे संवाद साधला. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची एक वेगळी ऊर्जा मिळते!”, असं ट्वीट करत लंके यांनी गडकरी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केलाय.

पृथ्वीराज बाबांना अतुलबाबांचा धक्का; मलकापुरातील ताकदीचे नेते आर आबा यांचा भाजपमध्ये प्रवेश ; मुंबईत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेनी डॉ अतुलबाबांच्या उपस्थितीत केले आबांचे स्वागत;


वेध माझा ऑनलाइन।
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती श्री. राजेंद्र प्रल्हाद यादव, माजी नगरसेविका सौ. अनिता राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती सौ. गीतांजली शहाजी पाटील, नगरसेविका सौ. स्वाती तुपे यांच्यासह मलकापुरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला  मलकापूर चे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आबांनी काँग्रेस सोडल्याची चर्चा आहे मात्र हा पृथ्वीराज बाबांना त्याठिकाणी मोठा धक्का मानला जातोय

दरम्यान आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला

मलकापुरचे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे यांच्याविरोधात नेहमीच एकाधिकारशाही कार्यपद्धतीचा आरोप होत होता आर आबांना मनोहर शिंदे यांची कार्यपद्धती पसंत नव्हती असे बोलले जात होते त्याचीही अनेक कारणे आहेत त्यामुळे ते लवकरात लवकर डॉ अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मार्गावर जातील अशा अटकळी बांधल्या जात होत्या आणि  मलकापुरातील राजकारणात मोठा स्फोट होणार हेही निश्चित झाले होते
त्यानुसार आज आर आबांनी आपला निर्णय घेत भाजप प्रवेश केला आहे 

भाजप प्रवेशानंतर राजेंद्र यादव म्हणाले...
मी अनेक वर्षे मलकापुरात काम करतोय. पण गेल्या 10 वर्षात मलकापुराचा विकास खुंटला आहे. या विकासाला गती देण्यासाठी आणि मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. 

दरम्यान यादव यांच्या घरातील सदस्य गेली 23 वर्षे मलकापूर नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. ते स्वतः 3 टर्म निवडून आले असून, गेली 10 वर्षे बांधकाम सभापती म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या पत्नी सौ. अनिता पाटील या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांचे बंधू अरुण यादव हेदेखील नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मोठा जनसंपर्क आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर म्हणून त्यांची ख्याती आहे.तसेच आर आबांची स्वतःची ताकद मलकापुरात आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग त्याठिकाणी आहे त्यांनी त्यांच्या उंचीने राजकारणात वावरावे अशी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र मनोहर शिंदेंच्या पालिकेतील व काँग्रेस पक्षामधील कार्यपद्धतीशी जुळऊन घेत ते आबांना शक्य नव्हते आबांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून डॉ अतुलबाबांचे नेतृत्व स्वीकारले ते आजच भाजपमध्ये  प्रवेशकर्ते झाले आहेत 

दरम्यान याचा फटका काँग्रेसला त्या ठिकाणी बसणार हे नक्की आहे तर दुसरीकडे डॉ अतुल भोसले याना मोठा राजकीय फायदा त्याठिकाणी होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत

Tuesday, June 25, 2024

मलकापूरचे नेते आर.आबा.उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार ; आजच मुंबईकडे झाले रवाना ;

वेध माझा ऑनलाइन
कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे त्यांचे मलकापूर मधील निकटवर्तीय नगरसेवक व काँग्रेसचे नेते राजेंद्र यादव उर्फ आर आबा हे उद्या भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे त्यांच्या सोबत मलकापुरातील 3 ते 4 नगरसेवक देखील प्रवेश करणार असल्याचे समजते...ते नुकतेच मुंबईला रवाना झाले आहेत अशीही माहिती मिळत आहे... 

मलकापूर येथील राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे... एकीकडे डॉ अतुल भोसले यांचे नेतृत्व आहे... तर दुसरीकडे मनोहर शिंदे यांची लिडरशिप आहे... सत्तेत मनोहर शिंदे हे जरी त्याठिकाणी होते तरी आर आबा याना बरोबर घेतल्याशिवाय त्यांच्या नेतृत्वाला पूर्णत्व त्याठिकाणी येत नव्हते... अशी चर्चा नेहमी असायची... आर आबांचा वापर करत मनोहर शिंदेंनी जमेल तेवढ राजकारण केलं खरं...मात्र मनोहर शिंदेंच्या एकूणच राजकारण करण्याची पद्धत तेथे  अनेकाना मान्य नव्हती...आजही मान्य नाही...असे काहीजण आजही खासगीत बोलतात... मनोहर शिंदे यांच्या एकाधिकारशाहीच्या राजकारणाला अनेकजण कंटाळले असल्याची तर नेहमीच  चर्चा असते... त्यांच्यावर विरोधकांकडून  याबाबत वारंवार आरोपही झाले आहेत...त्याची अनेक उदाहरणे आहेत...त्यापैकी एक उदाहरण जे नेहमी चर्चेत असते ते म्हणजे... नगराध्यक्षा सौ एडगे याना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर शासनाकडून मिळणारी चार चाकी गाडी मनोहर भाऊंनी पार्टी प्रमुख म्हणून पुढाकार घेऊन ताब्यात घेणे गरजेचे होते... पालिकेत याबाबत ठराव देखील झाला होता...त्यादरम्यान संपूर्ण राज्यभरातील लोकनियुक्त नगराध्यक्षाना या गाड्या मिळाल्या... तरी मलकापूरच्या नगराध्यक्षाना शेवटपर्यंत म्हणजे... त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत ही गाडी मिळालीच नाही...मग, त्यामागचे राजकारण काय ? हे गुलदस्त्यातच राहिले...पण, कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे...तो समाजात मोठा दिसला देखील नाही पाहिजे...ही प्रवृत्ती यामागे असल्याचे संपूर्ण मलकापूरला जाणवले...दरम्यान याविषयाबाबत पत्रकार वारंवार प्रश्न विचारत होते...मात्र त्यांना थातूर मातूर उत्तर देत मनोहरभाऊ वेळ मारून नेत होते... या कारणासह मलकापुरातील प्रत्येक कामात भाऊंचा नको तितका हस्तक्षेप असायचा... अशीही चर्चा असते...काँग्रेस पक्षाच्या नावावर त्यांची जरी ओळख असली तरी ... काँग्रेसपक्ष त्यांनी किती वाढवला... हा  संपूर्ण तालुक्याला आजही न सुटलेला प्रश्न आहे ...या , अणि अशा अनेक कारणामुळे काँग्रेस पार्टीतील अनेकजण त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील नाराज दिसतात ही वस्तुस्थिती आहे... त्यामुळे...नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मनोहर शिंदेंचे नेतृत्व मलकापुरात अजिबात चालले नाही असेच दिसून आले... तर डॉ अतुल भोसले त्यांना मलकापुरात खूपच भारी ठरले हेही दिसले... अशा अनेक कारणांमुळे मनोहर शिंदेंचे सहकारी त्यांच्याजवळ  कितपत राहतात,... की  त्यांना हळूहळू सोडून जातात... हेच आता यापुढे पहावे लागेल...

दरम्यान यापुढे भाजप प्रवेशानंतर आर आबा यांची ताकद अतुल भोसले याना मिळाल्यास मलकापुरात नक्कीच डॉ अतुल बाबांची सत्ता दिसेल असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे... होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर देखील आर आबा यांचा भाजप प्रवेश कराड दक्षिणच्या राजकारणाला भाजपमय करण्यासाठी चांगलाच हातभार लावणारा ठरणार... हेही निश्चित आहे... 
दरम्यान उद्या त्यांचा मुंबईत रीतसर भाजप प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे त्यासाठी आर आबा मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे

मनसेचा मोठा निर्णय ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन ।
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महाराष्ट्रात मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या मनसेच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत पक्ष पूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष स्वतः राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर सर्वेक्षण करत आहे. आतापर्यंत 89 जागांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आता या जागांसाठी संभाव्य उमेदवारांची नावे निवडली जात आहेत. यासोबतच महायुतीसोबत युती करायची की नाही यावरही वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरु आहे.
पक्षप्रमुख राज ठाकरे यांचाही जुलै महिन्यापासून महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. अमित ठाकरे हे राज ठाकरे यांना निवडणूक प्रचारात मदत करताना दिसणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केला नाही. निवडणुकीत राज ठाकरे यांनी कोणत्याही अटीशिवाय भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. मात्र महायुतीतील या तिन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीत विशेष काही करता आले नाही.

Monday, June 24, 2024

संजय राऊत यांची टीका; म्हणाले...तर ,नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते

वेध माझा ऑनलाईन।
संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून हल्लाबोल केला आहे. कुंपणानेच शेत गिळले या मथळ्याखाली संजय राऊत यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
2024 च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते. भाजपची घोडदौड 110 ते 120 वरच थांबणार होती. आयोगाच्या पक्षपातामुळे 240 चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्हे गोठवायलाच हवी होती, पण फुटिरांना ही चिन्हे देण्याचे काम आयोगाने केले. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला. कुंपणानेच शेत खाल्ले असेच हे घडले. पैसा, गुन्हेगारी आणि घोटाळे या तीन भयानक चक्रातून भारतीय निवडणुका बाहेर याव्यात, असे प्रत्येकाला वाटत असते. ते यावेळीही घडू शकले नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे, असा थेट आरोप संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर केला.

पावसाचा जोर मंदावला ; कोयना धरणात किती आहे पाणीसाठा ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तर जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला ४, तर नवजा येथे ५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयनेत पाण्याची आवक फक्त २ हजार ७५८ क्युसेक वेगाने होऊ लागली आहे. धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही यंदा लवकरच नवजाचा पाऊस ७०० मिलिमीटरजवळ पोहोचला आहे.

सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन वेळेत झाल्यामुळे मागील १९ दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली. पूर्व, तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही पावसाने अजूनही म्हणावा असा जोर धरलेला नाही. मागील १० दिवसांपासून पश्चिम भागात तर पावसाची उघडझाप सुरू आहे. एखादा दिवस पावसाने जोर धरला तर नंतर उघडझाप होत आहे. परिणामी धरणात अजून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू नाही. त्यातच सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला प्रत्येकी ४ मिलिमीटर पाऊस झाला, तर एक जूनपासून कोयनानगर येथे ५२६ आणि महाबळेश्वरला ४४० मिलिमीटरची नोंद झाली, तर नवजा येथे आतापर्यंत ६७३ मिलिमीटर पाऊस पडला आहे.पाऊस कमी झाल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी झाली आहे. त्यामुळे सावकाशपणे धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला होता. टक्केवारीत हे प्रमाण १५.६६ आहे. तरीही गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.



पुन्हा तूतारिच वाजणार ; शरद पवारांची खेळी ;

वेध माझा ऑनलाइन
लोकसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शरद पवार गटाच्या अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले आहे. या उमेदवारांनी पिपाणी चिन्हावर लाखभर मते घेतली आहे. परंतु आता यानंतर निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत गटाने आयोगाला पत्र लिहिले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार घडाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. परंतु निवडणुकीत या चिन्हाला जुळणारे पिपाणी चिन्ह काही अपक्ष उमेदवारांना देण्यात आले आहे. याचाच फटका पवारांच्या उमेदवारांना बसला आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत याच कारणामुळे शरद पवार गटाला फटका बसू नये म्हणून शरद पवार गटारे पिपाणी चिन्ह वगळण्यात यावे, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. आता शरद पवार गटाची ही विनंती आयोगाने मान्य केल्यास पिपाणी चिन्ह वगळण्यात येईल. यामुळे याचा थेट फायदा शरद पवार गटाला होईल.

तो आला पोलीस भरतीला, पण गेला जेलमध्ये ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावर खडाखोड करणं महागात पडलं आहे. त्याला थेट जेलची हवा खावी लागत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
जालन्यात पोलिस भरती मैदानी चाचणी सुरू आहे. यामधून 102 पोलीस शिपाई आणि 23 पोलीस चालक अशा एकूण 125 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. सध्या या भरतीची मैदानी चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. याच भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सोमवार पेठेतला रहिवासी अविनाश अशोक माने हा तरुण आला होता. त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, प्रमाणपत्र प्रदान केल्याची तारीख 20 जून 2024 अशी होती. मात्र त्याने शहरातील आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाकडून सांगणकावरून 15 एप्रिल 2024 अशी बनावट कागदपत्र तयार केली. हा प्रकार उघडकीस येताच या तरुणावर शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे.

उमेदवार अविनाश माने आणि आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाविरोधात शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420, 465 आणि 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी पोलीस भरतीसाठी आलेल्या या तरुणाला एका चुकीमुळे आता थेट जेलची हवा खावी लागलीये.
दरम्यान, जालन्यात 125 पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी दिनांक 19 जूनपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. यंदा 102 पोलीस शिपाई पदांसाठी 4,071 आणि 23 पोलीस शिपाई चालक पदांसाठी 2,907 असे एकूण 6 हजार 978 अर्ज आले आहेत. त्या अनुषंगानं ही परीक्षा घेण्यात येत आहे.

Sunday, June 23, 2024

उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स किती?

वेध माझा ऑनलाइन।
सध्या भाजपचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या आभार दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सातारा जिल्ह्यातच नाही तर राज्य, देशभरात उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याच्या व त्यांच्या हटके स्टाईलचे अनेक फॅन्स आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा एखादा नवीन व्हिडीओ आला की तो सोशल मीडियात लगेच व्हायरल होतोच. शिवाय त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टावरचा फॉलोअर्स देखील लाखोंच्या घरात आहेत

सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत झाली. तसे पाहिले तर दोघांचाही जिल्ह्यत चांगलाच जनसंपर्क. मात्र, निवणुकीत उदयनराजे जिंकले. या निवडणुकीत उदयनराजेंचे सोशल मीडियावरील नेटवर्क जास्त फायद्याचे ठरले असे म्हणावे लागेल. 
उदयनराजेंना टक्कर देणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचीही टीम सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, या तिन्ही प्लॅटफॉर्मवर नियमित पोस्ट टाकणे, फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्यांना आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

नवनिर्वाचित खा. उदयनराजेंना नेमके फॉलोअर्स किती?
1) Facebook : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे फेसबुक पेजवर तब्बल 621K म्हणजे 6 लाख 21 हजार इतके फॉलोअर्स आहेत. याशिवाय त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्या नावाने फेसबुक पेज ओपन केली आहेत.जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या तुलनेत खासदार उदयनराजेंचे फॅन फॉलोअर्स जास्त आहेत. 

2) Instagram : इन्स्टावर खासदार उदयनराजे भोसले यांचे ३ लाख ७६ हजार फॉलोअर्स आहेत. या माध्यमावर युवावर्ग मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो.

3) X : खासदार उदयनराजे भोसले यांचे एक्सवर तब्बल ३ लाख २६ हजार २०० फॉलोअर्स आहेत. 

शशिकांत शिंदे यांचे किती फॉलोअर्स?
1) Facebook : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे फेसबुकवर १ लाख २९ हजार फॉलोअर्स आहेत. 

2) Instagram : इन्स्टावर आमदार शशिकांत शिंदे यांचे फॉलोअर्स पहिले तर ते ९१ हजार फॉलोअर्स इतके आहेत. 

3) X : एक्सवर शशिकांत शिदे यांचे ६८ हजार ९०० फॉलोअर्स आहेत.



कोयना धरणात 2 दिवसात किती आहे पाणीसाठा ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कायम आहे. यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.24 टीएमसी इतका झाला असून तर रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 42 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 15 आणि महाबळेश्वरला 15 मिलीमीटरची नोंद झाली आहे. 

सातारा जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. ६ जूनपासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. पूर्व भागात यंदा धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. बंधारे भरले आहेत. तसेच विहिरींची पाणीपातळीही वाढली आहे.सध्या जमिनीला वापसा नसल्याने खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडणार नाही. परिणामी खरीपातील पेरणी यंदा १०० टक्के होण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसापासून पूर्व भागात पाऊस कमी झाला असलातरी पेरणीसाठी अडचणी येणार नाही. तर पश्चिमेकडे पावसाचा जोर आहे.
कास, बामनोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर यासह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तसेच पश्चिमेकडील धरण क्षेत्रातील पाऊस सुरू आहे .यामुळे धरण पाणीसाठा हळूहळू वाढू लागलाय. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोयनानगर येथे 68 तर नवजाला 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरलाही 60 मिलिमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे 522, नवजा 668 आणि महाबळेश्वरला 436 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसात कोयना धरणात एक टीएमसीने वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी धरणात १५.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील विसर्ग मागील काही दिवसापासून बंद आहे.

SBI उघडणार 400 नवीन शाखा ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन।
देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपलं नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार बँक आता नवीन आर्थिक वर्षात 400 नवीन शाखा उघडणार आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 137 शाखा उघडल्या आहेत. त्यापैकी ५९ नवीन ग्रामीण शाखांचा समावेश आहे. त्यात आता नवीन 400 शाखा उघडल्यानंतर बँकेचा व्यवहार आणि अन्य गोष्टी आणखी सोप्प्या होतील.

याबाबत SBI चे अध्यक्ष दिनेश खारा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला कोणीतरी विचारले की 89 टक्के डिजिटल आणि 98 टक्के व्यवहार शाखेच्या बाहेर होत आहेत, आता शाखेची गरज आहे का? तर होय… शाखांची आणखी गरज आहे. कारण नवीन क्षेत्रे उदयास येत आहेत. बहुतेक सल्लागार आणि संपत्ती सेवा यासारख्या काही सेवा आहेत ज्या केवळ शाखेतून दिल्या जाऊ शकतात असं ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात देशभरात 400 नवीन शाखा उघडण्याची आमची योजना आहे. मार्च 2024 पर्यंत SBI च्या देशभरात 22,542 शाखा होत्या असं दिनेश खारा यांनी सांगितलं.

दरम्यान, सहाय्यक कंपन्यांच्या कमाईबद्दल विचारले असता, खारा म्हणाले की, SBI त्यांची यादी करण्यापूर्वी त्यांचे कार्य आणखी वाढवण्याची प्रतीक्षा करेल. त्यांचे ऑपरेशन वाढवल्याने मूल्यांकन वाढेल आणि पॅरेन्ट एसबीआयसाठी चांगले परतावा सुनिश्चित होईल. उपकंपन्यांचा विचार केला तर त्यांची कमाई भांडवली बाजारातून होईल. कदाचित, आम्हाला ते थोडे अधिक वाढवायचे आहे, आणि नंतर आम्ही या कंपन्यांमधील आमची होल्डिंग कमाई करण्यासाठी भांडवली बाजारात जाण्याचा विचार करू. परंतु चालू आर्थिक वर्षात नाही असं दिनेश खारा यांनी म्हंटल.

पुण्यात 13 वर्षीय मुलीवर वडील चुलता व चुलत भावाकडून बलात्कार ;पुणे हादरले;

वेध माझा ऑनलाइन।
शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हे वाढताना दिसत आहे. पोर्शे कार आपघातानंतर पुण्यात रोज हदरवणाऱ्या घटना घडत आहेत. पुण्यात काही दिवसात 70 पेक्षा जास्त आपघात झाले असून यामध्ये अनेक जणांचा बळी गेला आहे. यासोबत पुण्यात आता महिला देखील असुरक्षित असल्यांचं समोर आलं आहे. मात्र सध्या पुण्यात आणखी एक खळबजनक घटना घडली आहे. ज्यामुळे पुणे हादरलं आहे.

13 वर्षीय मुलीवर बलात्कार-
पुण्यातील हडपसर येथे चक्क 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. कहर म्हणजे मुलीचा बलात्कार तिचे वडील, काका आणि चुलत भाऊ यांनी केला आला आहे. अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने पुण्यात धूमाकूळ घातला होता. मात्र, आता या सुस्कृंत शहरात महिला, तरुणी आणि लहान मुली असुरक्षित असल्याचं दिसतंय.

वडीलांकडून मारहाण-
2022 मध्ये पीडीत मुलीवर चुलत भावाने बलात्कार केला होता. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. तर, जानेवारी 2024 मध्ये पीडित तरुणीच्या काकाने रात्रीच्यावेळी फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचंही आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.



वेध माझा ऑनलाइन।

गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्म हाकेंचं उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं. तसेच सगेसोयरे अधिसूचना लागू करू नये, अशी लक्ष्मण हाकेंची मागणी आहे.

लक्ष्म हाके यांच्या या उपोषणाची धग आता खेड्यापाड्यात पसरली आहे. अनेक ओबीसी बांधवांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद येथील ओबीसी बांधवांनी हाके यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू केलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.
ओबीसी समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा समाज असा वाद होताना दिसत आहे. अशात बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद येथील ओबीसी आंदोलकांनी मोठी मागणी केलीये.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. दुसरीकडे हाके यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथून मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना झाले आहेत.
मराठ्यांच्या जमिनी आमच्या नावावर करा”
राज्य सरकारला जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावावर करावेत, असं आव्हान पाटण येथील आंदोलकांनी सरकारला दिलं आहे.



उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री; उपस्थितांमध्ये हशा, उपस्थितांची वाहवा ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मिमिक्री केल्याचे काल कराडात पहायला मिळाले त्यावेळी उपस्थित जनसमुदायामधून त्यांना टाळ्यांच्या गजरात मोठी वाहवा मिळाली 

खासदार उदयनराजे भोसले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून चांगल्या मतांनी निवडून आले आहेत त्यानिमित्ताने त्यांचा जिल्ह्यात आभार दौरा सुरू आहे कराड दक्षिणमधील नारायणवाडी याठिकाणी ते या दौऱ्यानिमित्त आले असता त्यांनी आपल्या भाषणातून निळू फुले यांची मिमिक्री केली

डॉ अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठे मताधिक्य देत आपली ताकद दाखवून दिली आहे त्यांचे कौतुक करताना अतुल भोसले यावेळी आमदार होणार आणि 100 मार्कानी पास होऊन आमदार होणार हे  सांगण्यासाठी त्यांनी निळू फुले यांच्या एका चित्रपटातील प्रसंग लोकांसमोर उभा केला यावेळी त्यांनी ही मिमिक्री सादर केली

पुण्यात पुन्हा एकदा अपघात ; आमदाराच्या पुतण्याने दोघांना उडवलं!

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यात पुन्हा एकदा पोर्शे कार अपघातासारखा थरार पाहायला मिळाला आहे. पोर्शे कार अपघातानंतर पुन्हा एकदा पुणे शहरात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने पुण्याच्या रस्त्यावर कार चालवताना दोघांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावरील कळंब येथे झाला.

अपघातात एकाचा जागीच मृत्यू
दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. तसेच यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे दोघांना चिरडलं असून यातील एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात ओम सुनिल भालेरावचा जागीच मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे खेड तालुक्याचे आमदार आहेत. त्यांचा पुतण्या मयुर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्याने मद्यप्राशन केलं होतं का? हे देखील तपासण्यात येणार आहे. 
या अपघातात ओम भालेरावचा मृत्यू झाला. ओम भालेराव हा 19 वर्षाचा होता. मयुर मोहिते हा पुण्याकडे जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. तो विरूद्ध दिशेने गाडी चालवत होता. त्यावेळी समोरुन आलेल्या दुचाकीला भरधाव गाडीने उडवलं. या अपघातात दुसरा तरूण हा गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुणे पोर्शे प्रकरणानंतर हा दुसरा अपघात झाला आहे. यामध्ये आणखी एका आमदारांचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच आता दुसऱ्या अपघाताने पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

पुणे पोर्शे अपघातात आमदार सुनिल टिंगरेंचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं नाव आलं. दोन्ही आमदार हे अजित पवार गटाचे आमदार आहेत.


Saturday, June 22, 2024

हायवेच्या नियोजनशून्य कामावर पृथ्वीराज बाबा भडकले; हायवेवरील ट्राफिक समस्या गांभीर्याने घेण्याबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

वेध माझा ऑनलाइन।
दोन दिवसापूर्वी कराड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हायवेवरील कामामुळे आटके टप्पा व पाचवड फाटा येथे पाणी साचल्याने वाहनांची मोठी रांग लागून दुरवर ट्राफिक झाले होते. याबाबत कराडचे पत्रकार अस्लम मुल्ला यांनी ट्राफिक समस्येची बातमी केली होती तसेच दक्ष कराडकर या सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन हायवेवरील कामामुळे निर्माण झालेली ट्राफिक समस्येबाबत माहिती दिली. त्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ट्राफिक परिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी करून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कराड शासकीय विश्रामगृह येथे हायवेच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन तिथूनच NHAI (एन एच ए आय) चे प्रोजेक्ट प्रमुख पंधरकर यांना दूरध्वनीद्वारे कराड येथील हायवे च्या कामाची परिस्थिती सांगून झालेल्या पावसाने महामार्गांवर पाणी साठल्याने कशा प्रकारे ट्राफिक समस्या उद्भवते याची माहिती देऊन हायवेच्या नियोजनशून्य कामावर संताप व्यक्त केला. हायवेच्या नियोजनशून्य कामामुळे सामान्य नागरिकांना पहिल्या पावसातच समस्येला सामोरे जावे लागले यामध्ये सुधारणा करून तात्काळ आटके टप्पा व पाचवड फाटा येथील सर्व्हिस रस्त्यावर साठलेले पाणी जाण्यासाठी ड्रेनेज मार्ग करावा आणि इथून पुढील काम नियोजन पद्धतीने करावे अशा सक्त सूचना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या. 

आ. चव्हाण यांच्या सूचनेनंतर हायवेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जिथे पाणी साठले आहे त्या ठिकाणी जेसीबी च्या साहाय्याने पाणी जाण्यासारखा मार्ग केला व त्यानंतर काही वेळातच ट्राफिक पूर्ववत झाले. 

हायवेचे काम सुरु झालेपासून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीला प्रत्येक 15 दिवसांनी तर त्यानंतर वेळोवेळी हायवेच्या कामाबाबत अधिकाऱ्यांसोबत मिटिंग घेऊन कामाचे नियोजन बघितले आहे. कराड व मलकापूर येथील उड्डाणं पुलाच्या कामावेळी तर आ. चव्हाण यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून कामही वेळेत व्हावे आणि ट्राफिक समस्या सुद्धा होऊ नये याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आता उड्डाणं पुलाचे काम निम्याहून अधिक पूर्ण झाले असून आता कोल्हापूर कडे जाणाऱ्या हायवे विस्ताराचे काम सुरु आहे याठिकाणी निर्माण झालेल्या समस्येबाबत पुन्हा एकदा मिटिंग घेऊन सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या आहेत.

भूजबळांनी घेतला जरांगे पाटील यांचा समाचार ; म्हणाले... औकातीत रहा बेट्या...

वेध माझा ऑनलाइन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात सध्या शाब्दिक वार सुरू आहे. आज (22 जून) छगन भुजबळ हे वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी गेले होते. यावेळी त्यांनी जरांगे यांचा समाचार घेतला.

“औकीतत राहा बेट्या हो..आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही, कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं.”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

भुजबळ यांचा जरांगेंना इशारा
यावेळी मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा ‘माकड’ असा उल्लेख केला आहे. तसंच तो (मनोज जरांगे) बसलाय तिकडे, जातीयवाद करतोय. मनोज जरांगेंना आरक्षण म्हणजे काय ते माहित नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असा टोला देखील यावेळी भुजबळ यांनी लगावला.
पुढे बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगेंना आणखी एक टोला लगावला. आम्ही कुणाला धमक्या देत नाही, तसंच आम्ही कुणाला घाबरतही नाही, असं भुजबळ म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवाबाबतही भाष्य केलं. सगळ्यांनी मिळून पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे कारस्थान रचले, असा आरोप भुजबळ यांनी केला.
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली हाकेंची भेट
दरम्यान, वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनजंय मुंडे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, गिरीष महाजन हे सर्व नेते उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांनी सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, असं आश्वासन दिलं. तसंच आपल्या मागण्याबाबत सरकार गंभीर आहे, याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असा विश्वासही यावेळी छगन भुजबळ यांनी हाके यांना दिला. दरम्यान, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण स्थगित केले.



अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा करणार मुस्लिम अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न ; सोनाक्षीचे सासरे म्हणाले...दोघांचे मनोमिलन झाले आहे त्यामुळे धर्माचा विषय येत नाही...

वेध माझा ऑनलाइन ।
बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. गुरुवारी, शत्रुघ्न यांनी आपल्या पत्नीसह मुलीच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांची भेट घेतली. काही दिवसांपासून माध्यमांत शत्रुघ्न सिन्हा या लग्नाबाबत नाखुश असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, या भेटीनंतर या चर्चा आता कुठेतरी थांबल्या आहेत.

अशातच सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सोनाक्षी मुस्लिम अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे. ती लग्नानंतर हिंदू धर्म सोडणार का?, ती इस्लाम धर्म स्वीकारणार काय?, अशा चर्चा रंगत होत्या. याबाबत आता सोनाक्षीचे होणारे सासरे इक्बाल रतनसी यांनी खुलासा केला आहे.

"सोनाक्षी आणि जहीर यांचं मनोमिलन झालं आहे. त्यांचे हृदय जुळले आहे. त्यामुळे यामध्ये धर्माचा कुठेच विषय येत नाही. हिंदू भगवान म्हणत असतील किंवा मुसलमान अल्लाह पण शेवटी आपण सर्व मनुष्य आहोत. माझा आशिर्वाद दोघांसोबत आहे.”, असं इक्बाल रतनसी यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर सोनाक्षी धर्मांतर करणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे

मागच्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणारे सोनाक्षी आणि जहीर आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 


अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए, ; छगन भुजबळ यांचे तडाखेबाज भाषण / वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन ।
ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनजंय मुंडे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, गिरीष महाजन हे सर्व नेते उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांनी जोरदार भाषण करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. तसंच आक्रमक भाषेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी करत ओबीसी आंदोलकांना ऊर्जा दिली.

छगन भुजबळ म्हणाले...
“अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए, शायद अपनी याद उनको दिलानी होगी’, असं भुजबळ यांनी म्हणताच ओबीसी आंदोलकांमध्ये एक ऊर्जा दिसून आली. तसंच यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला.
“औकीतत राहा बेट्या हो..आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही, कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं.”, असं भुजबळ म्हणाले.
“..तर ओबीसी लोकसभा आणि विधानसभेतही आरक्षण मागतील”
तसंच पुढे ते म्हणाले की, “तुम्ही सांगाल तेच करायचं, ही दादागिरी थांबवा. लक्षात ठेवा कोणी म्हणेल, आम्ही ओनर आहोत. सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत, म्हणजे यांना दाबू, असे काहींना वाटत असेल. पण संबंधितांनी हा गैरसमज मनातून काढून टाकावा.”, असं ठणकावून भुजबळ यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केलं. “आम्ही लोकसभेवर जायचे नाही, विधानसभेवर जायचे नाही. अधिकार क्षेत्रात तुमचे 10-20 जण आणि आमचा एकही नको?, असंच जर चालू राहिलं तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी करावी लागेल. लढाई अजून संपलेली नाही, तर ती सुरु झाली आहे.”, असं भुजबळ म्हणाले आहेत.



शरद पवारांनी ओबीसींसाठी काही केलं नाही; भाजप ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जरांगे यांनी काही काळासाठी मराठा आंदोलन स्थगित केलं आहे. पण, आता ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आता सर्वांचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागलं आहे. अशात भाजप नेत्याने थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.

या आरोपांनी महाराष्ट्रातील राजकारण अजूनच  तापलं आहे. शरद पवार हे कायम ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत, असा आरोप भाजपचे ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. इतकंच नाही तर, मनोज जरांगे यांना पवारांनी पाठबळ दिल्याचंही फुके यांनी म्हटलंय.

परिणय फुके यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
“शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहिली आहे, हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी ओबीसींसाठी काहीच केलं नाही. उलट त्यांच्याविरोधात भूमिका घेतली.”, असा आरोप परिणय फुके यांनी केला.तसंच शरद पवार हेच मनोज जरांगे यांना पाठबळ पुरवत असल्याचा गंभीर आरोप देखील परिणय फुके यांनी केलाय. इतकंच नाही तर,  जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांनी काही आरोप केले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले तर राज्यात तेढ निर्माण होईल, हेच जरांगे यांना पाहिजे, असं परिणय फुके म्हणाले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले...ओबीसी नेत्यांची बैठक मॅनेज होती ;

वेध माझा ऑनलाइन /
राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला गाजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ओबीसी नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासंदर्भात मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.सरकारने घेतलेली बैठक ही पूर्णपणे मॅनेज केलेली बैठक होती असं वक्तव्य मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटलांनी प्रश्न केला उपस्थित? 
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच कुणबी प्रमाणपत्रांची चौकशी होणार असेल तर मंडल आयोगाने दिलेलं १४ टक्के आरक्षण देखील घालवलं पाहिजे. तसेच वरचं तर बोगस आहेच. त्यामध्ये काही दुमत नाही. तसेच मराठे त्याबद्दल गप्प आहेत. त्याच्यावरचं १६ टक्के आरक्षण बोगस असतं, सरकार एका बाजूने बोलणारं नसेल तर दूध का दूध आणि पानी का पानी केलं जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
याशिवाय १४ टक्क्यांचं आरक्षण १६ टक्के आणि त्यानंतर ५२ टक्के कसं झालं? तसेच १४ टक्के आरक्षण देखील रद्द करा हीपण आमची मागणी आहे. मंडल आयोगाने आरक्षण दिलं तेव्हा सर्व्हे, जातनिहाय जनगणना सगळं केलं असणारच. ओबीसींची यादीही तयार असेल. जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजांची केली. मात्र जर खोटं असेल तर ते १४ टक्के आरक्षण देखील रद्द झालं पाहिजे. इंग्रजांची जनगणना खरी आणि आमची १८८४ च्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या असं कसं चालेल?” असा रोखठोक प्रश्न मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे.
 सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणीत ओबीसी बांधवांचाही फायदा होणार :
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणले की, छगन भुजबळचं काय बोलायचं? तो काहीही रद्द करा म्हणत आहे. त्याने सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घातल्या आहेत. तो म्हणतोय रद्द करा हा जातीयवाद नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणीत ओबीसी बांधवांचाही फायदा होणार आहे. ते तो रद्द करा म्हणतोय. याची मागणीच अशी असते ज्यात काही तथ्य नसत.
मराठ्यांचं वाटोळं होईल अशी त्याची म्हणजेच छगन भुजबळ यांची एक तरी मागणी असतेच. मराठ्यांच्या मागण्यांना विरोध करायचा हा भुजबळांचा सध्यातरी धंदाच झाला आहे अशी खरमरीत टीका मनोज जरांगेंनी केली आहे.



मनोज जरांगेची उंची आहे का? ओबीसी नेत्यांची टीका ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. तर, काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी देत तात्पुरते आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र, आता ओबीसी नेते पुढे आले आहेत. त्यामुळे सरकारपुढे दुहेरी प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्र आहे.

अशात मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी टीका केली आहे. जरांगे दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का?, अशी टीका तायवाडे यांनी केली आहे. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होतेय, असा आरोप देखील केला आहे.

“जरांगे पाटील ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात.त्यांची एवढी ऊंची आहे का?, अगोदर याचा विचार व्हायला हवा. एखाद्या व्यक्तीचे राजकीय करीअर संपवणे किंवा तुमच्या जातीच्या भरवशावर त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ यांच्या पाठीमागे उभे राहतील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही.”, असा इशाराच यावेळी तायवाडे यांनी दिला आहे.

तसंच पुढे ते म्हणाले की, “छगन भुजबळ हे राज्यातील एकमेव ओबीसी मधील मोठे नेते आहेत. जर, त्यांचं अस्तित्व संपवण्याची भाषा केली जात असेल तर, येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडते, हे दाखवून देऊ”, असं बबनराव तायवाडे म्हणाले आहेत.

मनोज जरांगे काय म्हणाले होते?
“विरोधी लोक बोंबलत आहेत, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांचा नेता बोंबलत आहे. मराठ्यांनी मतं देऊनही ते तुमच्या छाताडावर पाय देत आहेत. तुम्ही मतदान करुनही त्यांना जातीचा इतका स्वाभिमान असेल तर मग तुम्हाला का नसावा?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी मराठा नेत्यांना केला आहे.

तसंच, त्यांचे नेते त्यांच्या समाजाच्या आंदोलनात जात असतील तर आता मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आलं पाहिजे. आम्हीही आमच्या जातीच्या मोर्चात जाऊ, असे मराठा नेत्यांनी सांगितले पाहिजे, असंही जरांगे पाटील म्हणाले होते. त्यामुळे सध्या जरांगे आणि ओबीसी नेते यांच्यात वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतंय.



लक्ष्मण हाके यांच्या भेटीला जाणार मंत्रीमंडळाचे शिष्ठमंडळ ; कोण कोण मंत्री घेणार भेट ;वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलंच चर्चेत आहे. ओबीसी आरक्षण बचाव करण्याची लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. अशातच आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अन्य मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज पुणे आणि जालना येथे बसलेल्या वडीगोद्री येथील उपोषणस्थळी भेट देणार आहेत.

आज लक्ष्मण हाकेंची शिष्टमंडळ भेट घेणार :
ओबीसी आरक्षणावरून रान उठवलेल्या लक्ष्मण हाके यांची आज शिष्टमंडळ भेट घेणार आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेची भेट घेणार आहे.

या शिष्टमंडळात पाच मंत्री, एक आमदार व एक माजी आमदार असणार आहे. हे शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक अॅड.मंगेश ससाणे यांची भेट देखील घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जाऊन भेट घेणार आहेत.
लक्ष्मण हाकेंची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात कोण-कोण? :
मंत्री छगन भुजबळ
मंत्री अतुल सावे
मंत्री गिरीश महाजन
मंत्री उदय सामत
मंत्री धनंजय मुंडे
मंत्री संदीपान भुमरे
माजी आमदार प्रकाश शेंडगे
आमदार गोपिचंद पडळकर

जालना येथील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी देखील गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामध्ये मराठा आरक्षणासंबंधी सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. तसेच सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त करत त्याला विरोध केला आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल आहे.



उदयनराजेंनी थोपटले दंड : काय आहे बातमी;

वेध माझा ऑनलाइन।देशभरात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र या निवडणुकीदरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्यच लक्ष लागलं होत.

जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? सातारा लोकसभा मतदार संघ हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणल्यानंतर उदयनराजे भोसले यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आमचीच पकड राहील असे सांगत दंड थोपटले आहेत.

साताऱ्यातील कोरेगाव येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली आहे. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले आहे.

उदययनराजे यांनी विरोधकांना केलं थेट आवाहन :
साताऱ्यात उदययनराजे यांनी विरोधकांना थेट खुलेआम आवाहन दिले आहे. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, आणि कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव शिवेंद्रराजे, महेश शिंदे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत असे उदयनराजे भोसले कार्यक्रमावेळी म्हटले आहेत.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांना गाफील न राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. 



Friday, June 21, 2024

हवामान खात्याचा इशारा, पहा... कोणत्या भागात येणार मुसळधार?

वेध माझा ऑनलाइन।
मुंबई, पुणे शहरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. याबाबत आता हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. पुणे शहरातील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यासह नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबई आणि मुंबई शहराच्या उपनगरांमध्ये देखील मान्सूनने हजेरी लावली. सध्या मुंबई आणि मुंबई शहराच्या उपनगरांमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याची शक्यता आहे. इथे कमाल तापमान हे 34 अंश तर किमान तापमान हे 27 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं आहे.
कोकण भागातील दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.



HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट समोर आलीये. बँकेने काही नवीन नियम काढले आहेत. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.

बँकेच्या ग्राहकांना (HDFC) ठराविक रकमेपेक्षा कमी यूपीआय व्यवहारांसाठी एसएमएस प्राप्त होणार नाहीत. बँकेने हा निर्णय घेतला असला तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होणार नाही. 25 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे.

ही सेवा होणार बंद
एचडीएफसी बँकेने (HDFC) ग्राहकांना पाठवलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले की, 25 जून 2024 पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सेवेमध्ये काही बदल केले जात आहेत.
तुम्ही यूपीआयद्वारे एखाद्याला 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तरच एसएमएस अलर्ट पाठवला जाईल. त्याचप्रमाणे 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास एसएमएस अलर्ट पाठवला जाईल.
HDFC बँकेचा निर्णय काय?
आतापर्यंत एचडीएफसी बँक (HDFC) तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर संदेश पाठवते. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही कोणतेही पेमेंट करता किंवा तुमच्या खात्यात कुठूनतरी पैसे प्राप्त करता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल लगेच एसएमएस येतो. हा व्यवहार 10 रुपयांचा असला तरी संदेश मिळतो. आता ही प्रणाली संपुष्टात येऊन पुढील महिन्यापासून नवीन प्रणाली लागू होणार आहे.
ईमेल अलर्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे. ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहारांवर ईमेल अलर्ट मिळत राहतील. बँकेने सर्व ग्राहकांना त्यांचे ईमेल अपडेट करण्यास सांगितले आहे. बँकेने सर्व ग्राहकांना ईमेल अपडेट करण्यासाठी लिंकही पाठवली आहे.



सलमान खान शूटिंगसाठी महाबळेश्वरमध्ये! पण कोणाच्या बंगल्यात आहे वास्तव्य ; वाचा सविस्तर

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खानने ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल होत पाहुणचार घेतल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे सलमान ज्या बंगल्यात थांबला आहे तो देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व धीरज वाधवान बंधूंचा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, देशभरातील पर्यटकांसह दिग्गज राजकीय नेत्यांपासून कलाकारांना भुरळ घालणाऱ्या या निसर्गरम्य महाबळेश्वर नगरीमध्ये उद्योगपती वाधवान यांचा दिवाण व्हिला हा आलिशान बंगला गेली अनेक वर्षे आहे. हा ‘दिवाण व्हिला’ बंगला कोरोना काळात वाधवान बंधूंचे शेवटचे एकत्रित वास्तव्य ठरले महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर वाधवान कुटुंबीयांच्या मालकीचा ‘दिवाण व्हिला’ हा आलिशान बंगला आहे.
सध्या महाबळेश्वर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. अशा वेळी सुपरस्टार सलमान खान वाधवान यांच्या बंगल्यात थांबला कसा? सलमान खान व वाधवान यांचे काय संबंध?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.