लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होते.तर निवडणूक आयोगाकडे त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी हे खुले चिन्ह होते. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला. परिणामी,संपूर्ण राज्यात पिपाणीला दीड लाख मते गेली असून,साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हच कारणीभूत आहे असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले... आमच्या पक्षात निवडून आलेल्या आठ खासदारांपैकी बहुतांश खासदार नवे चेहरे आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment