सातारा दि.4 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 42 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 390 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.दरम्यान 157 जण नवीन बाधित सापडले असल्याचे रिपोर्ट्स आलेत...
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या...
390 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 35, कराड येथील 105, फलटण येथील 5, कोरेगाव येथील 33, वाई येथील 49, खंडाळा येथील 2, रायगाव येथील 28, पानमळेवाडी येथील 35, महाबळेश्वर येथील 30, म्हसवड येथील 14 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 54 असे एकुण 396 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -350400*
*एकूण बाधित -59268*
*घरी सोडण्यात आलेले -55951*
*मृत्यू -1859*
*उपचारार्थ रुग्ण-1458*
राज्यात आज 8998 बाधितांची वाढ
राज्यात आज 8998 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6135 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2049484 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 85144 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.66% झाले आहे.
No comments:
Post a Comment