Monday, January 31, 2022

ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांचा सही करण्यास नकार, भुजबळांची माहिती...राज्यसरकारनेच अनेक चुका केल्या - मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर...

वेध माझा ऑनलाइन -  राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही करण्यास नकार दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका न घेण्याच्या संदर्भात विधीमंडळात एकमतानं विधेयक पारीत केल्यानंतरही कोश्यारींनी सही केली नाही, असं भुजबळांनी म्हटलं आहे. 

राज्यपालांनी 8 कोटी ओबीसींच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे.  आम्ही संध्याकाळी पुन्हा राज्यपालांची भेट घेऊन विधेयकावर सही करण्याची विनंती करणार आहोत, असं भुजबळ म्हणाले. 

छगन भुजबळ  म्हणाले की, आपण अगोदर अध्यादेश तयार केला होता.  आयोग नेमून कामाला तयार झालो होतो.  त्या अध्यादेशावर राज्यपाल यांची सही झाली होती.   तो एकमताने मंजूर ही करण्यात आला होता.  सुप्रीम कोर्टाने विरोध केला नाही तेव्हा इम्पिरिकल डेटा मागितला होता. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला होता. भाजपनेही तेव्हा सपोर्ट केला होता, असं भुजबळ म्हणाले. 

भुजबळ म्हणाले की, राज्यपालांचा गैरसमज झालेला दिसतोय.  त्यांनी सही करायला नकार दिला आहे. मी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांशी बोललो आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतही बोलतो. हा राज्यातील 7 ते 8 कोटी ओबीसींचा प्रश्न आहे.   मुंबईला गेल्यानंतर दोन तीन मंत्री राज्यपालांना भेटणार आहेत, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, राजकारणाचा विषय 12 आमदार, इकडे तिकडे तो भाग वेगळा आहे.  हा सार्वत्रिक विषय आहे. ओबीसींचं नुकसान होईल असे अडथळे निर्माण करता कामा नये. त्यांनी का सही केली नाही,सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं,भाजपने सपोर्ट केला होता. ओबीसींवर अन्याय होईल असं करू नका. या विषयात राजकारण करू नये, असं भुजबळ म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, मला आशा आहे राज्यपाल महोदय समजून घेतील. निवडणूक डोक्यावर आहे, त्यामुळं ओबीसी राजकीय आरक्षण मिळावं, असं ते म्हणाले.  

राज्य सरकारने अनेक चुका केल्या आहेत. - मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर

यावर बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणासाठी सर्व पक्ष एकत्र आहे. राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात चूक झाली. त्यांनी अनेक चुका केल्या आहेत. आता जर हे चूक दुरुस्त करत आहेत तर सरकारनं राज्यपालांशी चर्चा करावी. राज्यपालांना फोनवर विचारलं पाहिजे. ओबीसी आरक्षणात आपण फेल झालो याचा ठपका कुणावर ठेवता येईल का असा प्रयत्न आहे. राज्यपाल महोदयांकडून याबाबत स्पष्टीकरण येईलच. कारण त्यांच्यावर जबाबदारी आहे. यासंदर्भात आम्ही देखील माहिती घेऊ, असंही मुनगंटीवार म्हणाले.

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय...नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु राहणार ?

वेध माझा ऑनलाईन - संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच, 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसेच, लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने. मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.

नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?

नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक आहे. तसेच मास्कही वापरण्यात यावा. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावं लागेल. 
सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचं लसीकरण झालेलं असावं. 
स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती असावी.
अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात. 
उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेनं.
अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार

कराड तालुक्यातील तारुख येथील शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने त्या परिसरात धास्ती...

वेध माझा ऑनलाइन - 
तारुख ता. कराड येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज दुपारी  ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात  बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आज दूपारी पिलले दृष्टीस पडताच शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना याबाबतची माहिती दिली.भिसे यांनी लगेचच वनाधिकारी यासह  मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना याबाबत माहिती देत सदर पिले ताब्यात घेतली.

दरम्यान ही बिबट्या मादी तिथे जवळपासच होती ती पिलाशिवाय आक्रमक होऊ नये म्हणून सदर तीन पिलांची आईसह भेट घडवून आणण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले त्यानूसार सायंकाळी त्याच शेतात ही तीन पिल्ले एका कॅरेट मध्ये घालून त्याच्या आसपास कॅमेरे लावण्यात आले. त्याचवेळी बिबट्याची मादी तिथेच निदर्शनास आली, ती परिसरात घुटमळतच होती  नंतर पिलांना कॅरेट मध्ये ठेवून वनअधिकारी जागेवरून निघून गेले. 
यावेळी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक रमेश जाधव, भारत खटावकर, आदी उपस्थित होते.

दिलासादायक बातमी...राज्यात कोरोनामुक्त वाढले...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 140  नव्या रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 423  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

राज्यात आज 91 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 

राज्यात आज  91 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत 3221 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात आज 39 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 67 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के आहे.  सध्या राज्यात 11 लाख 74 हजार 825 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या एक हजारांहून कमी, 1 हजार 837 कोरोनामुक्त

सोमवारी मुंबईत नवे 960 कोरोनाबाधित आढळले असून 1 हजार 837 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 9 हजार 900 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.  आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी 960 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 623  झाली आहे. तर मागील 24 तासांत 1 हजार 837 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

आज जिल्ह्यात 561 बाधीत, 998 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 561 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 998 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 10 कराड 98 खंडाळा 36 खटाव 44 कोरेगांव 42 माण 36 महाबळेश्वर 3 पाटण 11 फलटण 74 सातारा 157 वाई 14 व इतर 31 आणि नंतरचे वाढीव 5 असे  आज अखेर एकूण 561 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 998  जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या मंगळवारी निकाल देणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने केले स्पष्ट... जामीन अर्जावर निकाल होईपर्यंत आमदार राणे यांना पोलीस कोठडी देण्याची सरकारी पक्षाची मागणी...

वेध माझा ऑनलाइन - शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. यानंतर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या मंगळवारी दुपारी तीन वाजता निकाल देणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, जामीन अर्जावर निकाल होईपर्यंत आमदार राणे यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. मात्र ही मागणी जिल्हा न्यायालयाने अमान्य करीत राणे यांना न्यायालयातून जाण्याची मुभा दिली आहे. याबाबतचा निकाल उद्या देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नितेश राणे यांनी सादर केलेलं अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे.

खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगदा कामाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून पाहणी

वेध माझा ऑनलाइन -  राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याच्या  कामाची पहाणी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

यावेळी  भारतीय राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाचे पुणे विभागीय प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

सातारा-पुणे महामार्गावर वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या पुढाकाराने आणि  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  यांच्यावतीने   खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे काम जलगतीने सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे-सातारा- कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक या मार्गिका बोगद्यामुळे सुरळीत होणार आहे. हा मार्ग जिल्ह्यातून जाणार  असल्यामुळे सातारा जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. सुरक्षतेला प्राधान्य देवून या बोगद्याचे काम सुरु आहे. या बोगद्यामुळे अंतर कमी होण्याबरोबर वेळेची, इंधनाची, पैशाच्या बचतीबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री. पाटील यांनी पहाणी दरम्यान व्यक्त केला.

बंध माझा ऑनलाइन - राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद जळगाव याठिकाणी करण्यात आली आहे. काल येथील तापमान 5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. जळगावसोबतच उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता. त्यानंतर आजही उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत थंडीची लाट कायम राहणार असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आज एकूण 9 जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने आज नाशिकसह, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांत थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. आस सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात थंडगार वारे वाहत आहे. मध्य रात्री आणि पहाटे याठिकाणी धुक्यासह कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान एक अंकी नोंदण्याची शक्यता आहे

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे: पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाइन - भाजप सरकारला कडाडून लक्ष्य करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले की, भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. चव्हाण यांनी आज  पणजीत पत्रकार परिषद घेवून महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करा, असे आवाहन गोव्यातील जनतेस केले आहे.

गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनिल कवठणकर आणि नौशाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करीत लोकार्पण केले. या पुस्तिकेचे प्रकाशन देशात एकाचवेळी पाच राज्यातील 7 ठिकाणी करण्यात आले. यामध्ये गोव्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, लखनऊ येथे रणदिप सुरजेवाला, चंदीगड येथे छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल, जलंधर येथे दिग्विजय सिंह, डेहराडून येथून सचिन पायलट, मेरठ येथून हार्दिक पटेल आदींनी महागाई वरील पुस्तिकेचे प्रकाशन करीत मोदी सरकारवर टीका केली.

 पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,* नोटबंदी, तसेच वस्तू आणि सेवाकर (GST) लागू करणे हे मोदी सरकारची मोठी चूक होती ‘‘सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. पण मोदी सरकार ती फुगवून दाखवत आहे.’’ मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि सद्याची स्थिती खुपच गंभीर आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोदी कसे आकडे दाखवतात त्याच्यावर देशातील लोकांची नजर आहे.

गोव्यामध्ये मागील वेळी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून सुद्धा कश्याप्रकारे जनतेचा जो कौल आहे त्याचा भाजपने अनादर केला गेला हे सर्वज्ञात आहे. “मला पुर्ण खात्री आहे की यावेळी मागील चुकीची पुनरवृत्ती न होता काँग्रेसला बहुमत मिळणार आणि आम्ही स्थिर सरकार देणार. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी गोव्यातील जनता देणार नाही.’’ असेही श्री चव्हाण यावेळी  म्हणाले.

“मोदी सरकारने महागाई वाढवून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भावनांशी खेळ केला आहे. लोकांना त्रास दिला आहे. असे असताना, त्यांच्या भांडवलदार मित्रांचे उत्पन्न दिवसेंदिवस हजारो कोटींनी वाढत आहे.” असे चव्हाण म्हणाले.

“मोदी सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. याचा परिणाम बाजारावर झाला आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. पण मोदी अनेक करांच्या लुटलेल्या पैशातून पेट्रोल पंपावर आणि वर्तमानपत्रात आपल्याला जाहिराती दाखवण्यात व्यस्त आहेत.’’ मोदी सरकारने गेल्या सात वर्षात पेट्रोल आणि डिझेल मधून वसूल केलेल्या करातून 24 लाख कोटींची लूट केली आहे. एलजीपी गॅसपासून स्वयंपाकघरातील सर्व आवश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. 

श्री चव्हाण महागाईचे उदाहरण देत म्हणाले की, प्रति किलो चहाच्या पाकिटांची किंमत 2014 साली 130 ते 140 रुपये होती, जी आता 400 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 108 डॉलर होती, तरीही काँग्रेस सरकार कमी किमतीत म्हणजे रु 70 च्या घरात पेट्रोल देण्यात यशस्वी झाले. “आता कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 73 डॉलरवर आले असूनही पेट्रोल ची शंभरी पार झालेलीच आहे. अजून कोणतेही दर केंद्र सरकारने कमी केलेले नाहीत. अश्या प्रत्येक घटकावर / वस्तूंवर अतिरिक्त कर लावून मोदी सरकार जनतेची लूट करत असल्याचे सिद्ध होते.’’

"मोदी सरकारने ऑनलाइन व्यवहारांना चालना दिली, परंतु आता एटीएममधून स्वतःचे पैसे काढण्यासाठी आपणाला अतिरिक्त चार्जेस द्यावे लागत आहेत." अशी खंतही यावेळी श्री चव्हाण यांनी व्यक्त केली. भाजप आणि महागाई देशासाठी घातक आहे, त्यामुळे त्यांना एकजुटीने पराभूत केले पाहिजे. असे आवाहन यावेळी श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Sunday, January 30, 2022

मुंबईसह २० महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता...

वेध माझा ऑनलाइन - वाढीव वॉर्डांसह मुंबईतील प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा निश्चित करणे आणि बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार २ मार्चला अंतिम आराखडा प्रसिद्ध केला होईल. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमधील शाळा- कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्यात मुंबईसह २० महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कालावधी ८ मार्चला संपुष्टात येईल. त्यामुळे त्याआधी अर्थात फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील, अशी शक्यता होती. मात्र, प्रारूप आराखडा अंतिम करणे, बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमांकनाची प्रक्रियाच २ मार्चपर्यंत चालणार आहे. हा टप्पा पार पडल्यानंतर संबंधित महापालिकांतील आरक्षणाची सोडत जाहीर करणे आणि आचारसंहिता असा कार्यक्रम असतो. त्यामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. 
मुंबईतील प्रभागांची संख्या  नऊने वाढविण्यात आल्याने आता ती २२७ वरून २३६ झाली आहे. २३६ पैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतील, तर अनुसूचित जाती १५ आणि अनुसूचित जमातींसाठी २ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. 

असा असेल कार्यक्रम

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार १ फेब्रुवारीला प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्याचा कालावधी आहे. २६ फेब्रुवारीला या हरकती-सूचनांवर सुनावणी घेतली जाईल. २ मार्चला याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर  करायचा आहे. मुंबईसह ठाणे आणि अन्य महापालिकांसाठीही असाच कार्यक्रम आहे. 

ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित करीत ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारने या मर्यादेत २७ टक्के आरक्षणाचा निर्णय दिला. मात्र, इम्पिरिकल डेटाशिवाय आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने हा निर्णयही फेटाळून लावला आहे. यासंदर्भातील सुनावणीनंतर ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार

आज जिल्ह्यात 804 बाधीत तर 1293 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 804 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1293 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 22 कराड 156 खंडाळा 46 खटाव 82 कोरेगांव 62 माण 47 महाबळेश्वर 6 पाटण 36 फलटण 76 सातारा 190 वाई 45 व इतर 29 आणि नंतरचे वाढीव 7 असे  आज अखेर एकूण 804 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1293  जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कोविडच्या लसीमुळे २१ आजारांपासून संरक्षण मिळते ! ; जागतिक आरोग्य संघटनेने दिली महत्वाची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - जगभरात करोनाने थैमान घातलं, लाखो लोकांचे जीव घेतले. अनेक ठिकाणी तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. याशिवाय जगाचं आर्थिक चक्रही बिघडलं. मात्र, आता करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे हाच करोना आता नियंत्रणात येत आहे. करोना लस हेच करोनावरील परिणामकारक उत्तर आहे असं जाणकार सांगत आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता करोना लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची माहिती दिलीय. करोना लसीमुळे केवळ करोनापासूनच नाही, तर एकूण २१ आजारांपासून संरक्षण मिळतं. त्यामुळे करोना लस घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

व्हॅक्सिन्स वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने करोना लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २० पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन WHO ने केलंय.

करोना लसीमुळे कोणत्या २१ आजारांपासून संरक्षण होतं?
१. गर्भाशयाचा कर्करोग
२. पटकी/कॉलरा
३. घटसर्प
४. इबोला 
५. हेप बी 
६. इन्फ्लुएंझा
७. जपानी एन्सेफलायटीस
८. गोवर
९. मेंदुज्वर 
१०. गालगुंड 
१२. डांग्या खोकला 
१३. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया 
१४. पोलिओ 
१५. रेबिज
१६ रोटा व्हायरस 
१७. गोवर 
१८. धनुर्वात 
१९. विषमज्वर 
२०. कांजण्या
२१. पीतज्वर

कोरोनातून लता मंगेशकर बऱ्या झालेल्या आहेत ; ना. राजेश टोपे यांची माहिती

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी सर्वजण मनोभावे प्रार्थना करत आहेत. लतादीदींच्या हेल्थसंदर्भात एक मोठी बातमी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येतेय. त्या गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलेलं आहे.""न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बऱ्या झालेल्या आहेत.

सध्या ब्रेन इन्फेक्शनमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता त्या थोडं बोलूही शकतायत. डॉक्टरांना त्या प्रतिसादही देतायत. काही प्रमाणात त्यांना अशक्तपणा असून त्यावर उपचार सुरु असल्याचं," राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
दरम्यान कालदेखील लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. लतादीदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतीत सामदानी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती.
लता मंगेशकर आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. त्यांचा व्हेंटिलेटरचा सपोर्टही काढण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

येत्या 1 फेब्रुवारीपासून 'या' बँकांच्या नियमात बदल, जास्त चार्ज भरावा लागणार ...

वेध माझा ऑनलाइन -  तीन दिवसांनंतर म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या बँकांचे नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि पीएनबी बँकेच्या व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत.

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांमध्‍ये मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.

संजय राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकासोबत पार्टनरशिप ; राऊत यांच्या मुली आहेत त्या वाईन कंपनीच्या संचालक...किरीट सोमय्या यांचा थेट आरोप...

वेध माझा ऑनलाइन  - संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचं किरीट सोमय्या यांनी नुकतंच मुंबईत म्हटलं आहे. ते म्हणाले की, '' राऊतांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिजनेस पार्टनरशीप केली. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे.''

किरीट सोमय्या यांनी पुढे म्हटले की, ''मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. 16 एप्रिल 2021 रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.'' 

सोमय्या यांनी मॅगपी कंपनीबाबत अधिक माहिती देत म्हटले की, ''मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक 100 कोटींची आहे. कंपनीने 2 जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला कळवले.'' त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे.



कराडात महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त 'राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा दिवस' कार्यक्रम उत्साहात...पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती...

वेध माझा ऑनलाइन - प्रत्येक माणसाला जात, धर्म, पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता असतेच. ती जागृत करण्याच्या उद्देशाने पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा दिवस' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कराड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, कराड पंचायत समितीचे सभापती  प्रणव ताटे, जेष्ठ नेते सुभाष पाटील(काका), संभाजीराव गायकवाड, कांतीलाल पाटील, गंगाधर जाधव, सौ.सांगीता साळुंखे(माई), सौ. मीना बोरगावे,आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील,  कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, शिवाजी पवार, सुहास पवार, संतोष पाटील, वैभव हिंगमिरे, संतोष वेताळ, मोहसीन अंबेकरी, संजय पिसाळ पांडुरंग चव्हाण, अनुज पाटील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Saturday, January 29, 2022

कलेचं राजकारण होऊ नये , करू नये ; अभिनेता दिगदर्शक जुगलकिशोर ओझा यांनी अमोल कोल्हे आत्मक्लेश प्रकरणी व्यक्त केल आपलं मत...

वेध माझा ऑनलाइन - अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात भूमिकेला योग्य न्याय दिलाय...
मात्र अमोल कोल्हे यांनी भावनिक होऊ नये व कलाकाराने भावनेपोटी आत्मक्लेश करुन दिलगिरी व्यक्त करण्याची मुळीच गरज नाही...
कलेचं राजकारण होऊ नये व करु नये 
हे माझं परखड आहे असे अभिनेता दिगदर्शक जुगलकिशोर ओझा यांनी याविषयी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरमधील खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली. शिवाय, या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला गेला. तर, अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला. याविषयी विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत राजकीय क्षेत्राबरोबर कला क्षेत्रातूनदेखील याविषयी अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात अभिनेता दिगदर्शक जुगलकिशोर ओझा यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे कलेचे राजकारण होऊ देता कामा नये असे सांगत अमोल कोल्हे यांनी भावनिक होऊ नये व कलाकाराने भावने पोटी आत्मक्लेश करुन दिलगिरी व्यक्त करण्याची मुळीच गरज नाही असे या विषयासंबंधीचे आपले मत ओझा यांनी व्यक्त केलं आहे 
-

मार्चपर्यंत कोरोना संपुष्टात येऊ शकतो ; लाट ओसारतेय ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची दिलासादायक माहिती..

वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत चालली आहे. ओमायक्रॉनचाही धोका आता टळलेला आहे. त्यातच आता गेल्या दोन वर्षांपासून ज्या कोरोनाच्या संकटाशी आपण लढा देत आहोत, तो मार्चच्या मध्यवधीपर्यंत संपुष्टात येऊ शकतो, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पंढपूरच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनीविठ्ठलरुक्मिणीचे दर्शन घेत लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.

'कोरोनाचा न्युकॉन हा नवा व्हेरीएंट पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पण राज्यातील सद्य स्थितीआधारे तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा ; ऍड उदयसिंह पाटील

वेध माझा ऑनलाइन - तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी आहे सर्वांनी लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड उदयसिंह पाटील यांनी केले.

डिजिटल सभासद नोंदणी अभियानाच्या प्रशिक्षण शिबीर प्रसंगी ते बोलत होते.

उदयसिंह पाटील पूढे म्हणाले, 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा देशपातळीवर व राज्य पातळीवर अतिशय सक्षम नेतृत्व राहिले आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहताना काँग्रेसचा विचार हा घराघरात पोहोचवला पाहिजे. काँग्रेसने कधीही भेदभाव केला नाही. या देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान असून अनेक राष्ट्रपुरुषांच्या त्यागातून हा देश उभा राहिला आहे. मात्र, काही मूठभर लोक आता मनभेद निर्माण करून जनतेमध्ये फुट पाडत आहेत आणि हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
 सदर नोंदणी अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजेंद्र शेलार म्हणाले कि, काँग्रेस पक्षामध्ये तरुणांना काम करण्यास मोठी संधी आहे. भाजपने दोन कोटी नोकरी यांसह इतर सर्व खोटी आमिषे दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. तेव्हा प्रत्येकाने अधिक काम करताना काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचविला पाहिजे यासाठीच सभासद नोंदणी अभियान प्रभाविपणे राबविले पाहिजे. 
यावेळी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष डॉ सुरेश जाधव,  काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जि प सदस्य निवासराव थोरात, मंगला गलांडे, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, इंद्रजीत चव्हाण, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण तसेच कराड दक्षिण काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.


खासदार अमोल कोल्हे यांचा अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश ;

वेध माझा ऑनलाइन 
राष्ट्रवादी काँग्रेचे शिरुरमधील खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली. शिवाय, या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला गेला. तर, अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.

या वेळी माध्यमांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “जो एक सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे, जो मी २०१७ मध्ये केला होता.‘व्हाय आय किल्ड गांधी’ त्यामध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं मला हे वाटतं, की अनेकांनी मला व्यक्तिशा ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरंतर आम्हाला पसंत पडलेलं नाही आणि त्यांच्या विचारांना हा धक्का लागला, त्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत पोहचवली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. २०१७ मध्ये अजानतेपणे जी गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत

पुण्यात शाळा सुरु करण्याचा झाला निर्णय ; कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचं आजचे पुण्यातील चित्र ; आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी ; शाळा सुरु करण्याच्या निर्णय प्रशासन मागे घेतं का हे पाहणं ठरणार महत्वाच...

वेध माझा ऑनलाइन - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुण्यातही थैमान घातलं आहे. विशेष पुण्यातील कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ ही कमी झाल्याचं चित्र होतं. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं पाहून प्रशासनाने आज सकाळी शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही तासात एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झाला म्हणून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुसरीकडे पुण्यात आज कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढल्याचं चित्र आहे. कारण पुण्यातील आजची नवी कोरोनाबाधितांची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 410 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे काल ही आकडेवारी जवळपास साडे तीनहजार होती. पण हीच आकडेवारी आज दोन हजारांनी वाढली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णय प्रशासन मागे घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरु होणार आहेत.

पुण्यात आज दिवसभरात 5 हजार 410 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आज पुण्यात तब्बल 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील 7 तर पुण्याबाहेरील 8 मृतकांचा समावेश आहे. पुण्यात सध्या 358 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर 51 रुग्ण हे इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि 33 रुग्ण नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील सध्याची सक्रिय रुग्णसंख्या ही 33 हजार 528 इतकी आहे. दुसरीकडे पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दररोज कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीदेखील संख्या वाढू लागली आहे. पुण्यात आज दिवसभरात 8 हजार 215 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय

पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत माहिती दिली. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण ग्रामीण भागात चांगले सुरू आहे. 1 फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयातील तरुण-तरुणींनी दोन्ही डोस घ्यायला हवेत. 9वीपासून शाळा सुरू होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

पहिली ते आठवीचे वर्ग चार तासच
9वी पासून पुढचे सर्व वर्ग पूर्ण वेळेत भरवण्यात येणार आहेत. तर पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जाणार असल्याची माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.


राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख प्रकरणी केला धक्कादायक गौप्यस्फोट...राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता ;

वेध माझा ऑनलाइन - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या १०० कोटींच्या कथित आरोपामुळे राज्यात बरीच चर्चा झाली. या प्रकरणाची ईडीकडून सखोल चौकशी सुरु आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देशमुख प्रकरणी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

७ डिसेंबर २०२१ रोजी ईडीकडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात कुंटे यांनी अनिल देशमुखांबाबत चौकशीत खुलासा केला. देशमुख गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदलीसाठी अनाधिकृत याद्या पाठवायचे अशी कबुली कुंटे यांनी चौकशीत दिली. या यादीत संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठे आणि कोणत्या पदावर बदली करायची याचा उल्लेख असायचा. देशमुख त्यांचे पीए संजीव पालांडे यांच्याद्वारे ही यादी माझ्यापर्यंत पोहचवायचे असं कुंटे यांनी सांगितले.
खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख या याद्या पाठवत असल्याने मी त्यास नकार देऊ शकत नव्हतो असं सीताराम कुंटे यांनी ईडीच्या चौकशीत म्हटलं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अलीकडेच अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ओळखत नसल्याचा दावा केला होता. तर या प्रकरणी परमबीर सिंह  यांनी माघार घेतली आहे. तेव्हापासून देशमुख जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आता सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे देशमुख यांच्याविरोधात ईडी काय पाऊल उचलणार हे पाहणं गरजेचे आहे.

आ पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी ; पृथ्वीराज चव्हाण उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊला प्रचारार्थ झाले रवाना...

वेध माझा ऑनलाइन - पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या प्रचार रणनीती ची जबाबदारी सोपवली आहे. असा निर्णय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार झाला असून त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण उत्तरप्रदेश ची राजधानी असलेल्या लखनऊ ला रवाना झाले आहेत, तिथे त्यांच्या पत्रकार परिषदा होणार असून प्रचार यंत्रणेत सुद्धा ते सहभागी असणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हर्चुअल पद्धतीने प्रचार यंत्रणेला परवानगी दिली आहे त्याप्रमाणे सर्व पक्षांचा प्रचार या पाचही राज्यात सुरु आहे. व्हर्चुअल प्रचार तसेच पत्रकार परिषदा अश्या काही तंत्रानुसार प्रचार सुरु आहे. यानुसार तीन राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याचे महत्वपूर्ण काम काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविले आहे. आ. चव्हाण उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत. 

आज जिल्ह्यात 1091 बाधित, 1537 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1091 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1537 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 9 कराड 253 खंडाळा 62 खटाव 55 कोरेगांव 80 माण 52 महाबळेश्वर 18 पाटण 35 फलटण 121 सातारा 284 वाई 66 व इतर 43 आणि नंतरचे वाढीव 13असे  आज अखेर एकूण 1091 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1537  जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Friday, January 28, 2022

यशवंत विकास आघाडीच्या वतीने कराड पालिकेच्या महिला बाल कल्याण सभापती सौ स्मिता हुलवान यांचा सत्कार...

वेध माझा ऑनलाइन - 
कराडची महिला  बालकल्याण समिती राज्यात सर्वोत्कृष्ट म्हणून  घोषित करण्यात आली आहे या समितीच्या   सभापती सौ स्मिता हुलवान यांचा यानिमित्ताने यशवन्त विकास आघाडीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला

येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने सन 2017 व 2018 या सालात केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेत नगरपालिका गटात राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या समितीला घोषित केला आहे. 2017 पासून सभापती सौ स्मिता हुलवान यांनी सलग चार वर्षे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद भुषवले आहे. या पुरस्कारामुळे सभापती म्हणून सौ. हुलवान यांनी केलेल्या कामाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर परिषद, नगरपरिषद महासंघ यांनी 2014 सालापासून राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱया महिला व बालकल्याण समित्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला सन 2017-18 या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी राज्यातील पालिकांच्या महिला व बालकल्याण समित्यांकडून विहित नमुन्यात माहिती मागवण्यात आली होती. पुरस्कारासाठी समित्यांची निवड करण्यासाठी अनुभवी नगरसेविकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने ब वर्गात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीस राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे.
यानिजित्ताने येथील पालिकेतील सत्तारूढ यशवंत विकास आघाडीने सौ हुलवान यांचा नुकताच सत्कार केला  सौ हुलवान यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे

आज जिल्ह्यात 790 बाधीत, 1358 डिस्चार्ज :13 मृत्यू

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 790 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर  13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1358 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 17कराड 162 खंडाळा 47 खटाव 71 कोरेगांव 58 माण 36 महाबळेश्वर 14 पाटण 31 फलटण 93 सातारा 190 वाई 37 व इतर 27 आणि नंतरचे वाढीव 7 असे  आज अखेर एकूण 790 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1358 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

आता नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार ; ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नाकावाटे बुस्टर डोसच्या ट्रायलला दिली परवानगी...

वेध माझा ऑनलाइन - भारतात सध्या कोरोनाच्या ज्या लशी दिल्या जात आहेत. त्या इंजेक्शनामार्फत दिल्या जात आहेत. आता नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार आहे. भारत बायोटकेच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने  इन्ट्राननेझल बुस्टर डोसच्या ट्रायलला परवानगी दिली आहे.

डीसीजीआयच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने  कंपनीच्या इन्ट्रानेझल कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसच्या ट्रायलसाठी प्राथमिक मंजुरी दिली आहे. भारतातातील ही पहिली अशी लस आहे, जी नाकावाटे  दिली जाईल. या लशीत ओमिक्रॉनसह कोरोनाच्या इतर व्हेरिएंटलाही रोखण्याची क्षमता असल्याचं सांगितलं जातं आहे.
भारतात 10 जानेवारी, 2022 पासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात करण्यात आली. कोरोना योद्धा, हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासोबत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि इतर आजार असलेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जातो आहे.

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' आला आढळून ; .संक्रमित झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो...शास्त्रज्ञांचा दावा...

वेध माझा ऑनलाइन - चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी आता नवीन कोरोना व्हायरस 'निओकोव्ह'बाबत भीतीदायक बातमी दिली आहे. 2019 मध्ये वुहानमधूनच कोरोना व्हायरस जगभर पसरला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' आढळला आहे. याचे संक्रमण आणि मृत्यू दर दोन्हीही खूप जास्त आहेत. यामुळे संक्रमित झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो, असे तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. 

वुहानच्या शास्त्रज्ञांचा हा दावा स्पुतनिक या रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग आधीच घाबरले आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने धूमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत 'निओकोव्ह' चिंता वाढवू शकतो. 'निओकोव्ह' व्हायरस नवीन नाही, असेही अहवालात म्हटले आहे. 
दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये 'निओकोव्ह' व्हायरस आढळून आला आहे, तो सध्या फक्त याच पक्ष्यांमध्ये पसरतो, हा व्हायरस माणसांना देखील संक्रमित करू शकतो.

अखेर आमदार नितेश राणे न्यायालयात हजर

वेध माझा ऑनलाइन - भाजप आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आणि नितेश राणेंना 10 दिवसांत न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले. त्यानंतर आज नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी नियमित जामीनासाठी अर्ज केला. नितेश राणे यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा न्यायालयात उपस्थित होते. यासोबतच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने न्यायालयाच्या बाहेर उपस्थित होते. कार्यकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. यावेळी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान युक्तीवाद झाला. आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची गरज नसल्याचं त्यांच्या वकीलांनी म्हटलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणाचा कोर्टात उल्लेख केला यावेळी खानविलकर निकालाचा दाखलाही नितेश राणेंच्या वकीलांनी दिला.


काय आहे प्रकरण?

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

मिलिंद नार्वेकरांनी खोचक ट्विट करत नारायण राणेंना डिवचलं

सुप्रीम कोर्टाच्या निर्णया नंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लघु सुक्ष्म दिलासा ! असं ट्विट करून राणेंना डिवचलंय. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पहायला मिळू शकतो. याआधीच नारायण राणे यांनीही शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अनेकदा टीका केली होती.

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता - ना. बच्चू कडु यांनी दिले संकेत

वेध माझा ऑनलाइन - मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.  मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत केल्या आहेत. मार्च महिन्यात होणाऱ्या 10 आणि 12 वी च्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली. 


मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती.  मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत.
म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत केल्या. या ऑनलाईन बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Thursday, January 27, 2022

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द

वेध माझा ऑनलाइन - भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केलं. कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही. असा निर्णय घेणं असंविधानिक आहे.

सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं 

दरम्यान, बारा आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं होतं. तब्बल एक वर्षासाठी आमदारांचं निलंबन करणं योग्य होणार नाही. कारण एका आमदारांचं निलंबन म्हणजे केवळ एकट्याचं नव्हे तर त्या संपूर्ण मतदारसंघाचं निलंबन होतं. त्यामुळे त्या मतदारसंघालाही दिलेली ही एकप्रकारची शिक्षाच आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.

आज राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीद्वारे झाले निश्चित...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये 139 नगरपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतप्रसंगी उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयांमधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. ज्या 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले त्या नगरपंचायतीचे आरक्षण प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे-

अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपदाच्या 17 जागा असून त्यातील 9 जागा या अनुसूचित जाती (महिला) तर ८ जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
■ अनुसूचित जाती (महिला) राखीव- लाखणी, कुही, नातेपुते, खंडाळा (जि. सातारा), जळकोट (लातूर), माळेगाव बुद्रुक, पाटण, देहू, वैराग (सोलापूर)


■ अनुसूचित जाती (सर्वसाधारण) राखीव- म्हाळुंग श्रीपूर, भिसी, केज, देवणी, वाशी, औंढा नागनाथ, संग्रामपूर, लोणंद

अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण 13  जागा राखीव असून त्यातील 7 अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी तर 6 जागा अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत.

■ अनुसूचित जमाती (महिला) राखीव- धानोरा, अहेरी, मोहाडी, बाभुळगाव, साक्री, सोयगाव, शहापूर

■ अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)- दिंडोरी, देवरी, गोंडपिंपरी, राळेगाव, भिवापूर,सडक अर्जुनी

खुल्या प्रवर्गासाठी एकूण 109 अध्यक्ष पदे असून त्यातील 55 अध्यक्षपदे हे महिलांसाठी राखीव निश्चित करण्यात आले आहेत.

■ खुला प्रवर्ग  (महिला) राखीव- कळंब, समुद्रपूर, अर्जुनी मोरगाव, अनगर, पारशिवनी, मंठा, शेंदुर्णी, हिंगणा, वाभवे वैभववाडी, खालापूर, बदनापूर, चामोर्शी, भातकुली, महादुला, वाडा, वडूज, रेणापूर, दापोली, शिंदखेडा, एटापल्ली, देवगड-जामसंडे, जामणी, कारंजा, महागाव, नायगाव, शिरुर अनंतपाळ, पालम, सिरोंचा, पोलादपूर, कोरपना, देवरुख, देवळा, सेनगाव, लांजा, सावली. फुलंब्री, कोरची, तिर्थपुरी, तळा, पोंभुर्णा, जाफ्राबाद, पाटोदा, जिवती, शिर्डी, कुडाळ, निफाड, धारणी, कर्जत, कुरखेडा, वडगाव मावळ, कोरेगाव, सेलू, आष्टी, सालेकसा, शिरुर-कासार,

■ खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)- गुहागर, अकोले, मुक्ताईनगर, घनसावंगी, मानोरा, मंडणगड, माहूर, आष्टी (वर्धा), कवठे महांकाळ, लोहारा (बु), खानापूर, बार्शी-टाकळी, नांदगाव खंडेश्वर, मुरबाड, ढाणकी, कळवण, हातकणंगले, मुलचेरा, आजरा, दहिवडी, कणकवली, पेठ, पाली, बोदवड, तिवसा, मोताळा, मारेगाव, गोरेगाव, मंचर, मेढा, हिमायतनगर, मौदा, लाखांदूर, भामरागड, सिंदेवाही, मालेगाव-जहांगीर, वडवणी, सुरगाणा, अर्धापूर, चाकूर, धडगाव-वडफळ्या, पारनेर, नेवासा, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, माणगाव, म्हसळा, कसई-दोडामार्ग, कडेगाव, शिराळा, माळशिरस, माढा, चंदगड.

नगरसेवकांमधूनच नगराध्यक्षांची निवड

सन २०२० च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 12  नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे प्रचलित पद्धतीने नगरसेवकांमधूनच निवडले जात असून, त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करताना राज्यातील नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे राज्यातील नगरपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक प्रवर्गात निम्म्यापेक्षा कमी नाहीत इतकी पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. एखादी नगरपंचायत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी येत असल्यास तेथे ज्या प्रवर्गाच्या लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे, अशा प्रवर्गासाठी ती राखीव ठेवण्यात आली आहे.

आज जिल्ह्यात 913 बाधीत 1188 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 913 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1188 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 11कराड 181 खंडाळा 84 खटाव 74 कोरेगांव 70 माण 34 महाबळेश्वर 5 पाटण 17 फलटण 114 सातारा 254 वाई 37 व इतर 28 आणि नंतरचे वाढीव 4 असे  आज अखेर एकूण 913 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1188 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

पुढील 4 ते 5 दिवस थंडीचा जोर कायम राहणार ; हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

वेध माझा ऑनलाइन - सततचे हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. खरंतर, आणखी काही दिवस हवामानात असेल बदल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारताचा बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा खाली घसरत आहे त्यामुळे हवामान खात्याने थंडीचा जोर पुढील 4 तेे 5 दिवस कायम राहील असा अंदाज व्यक्त केला आहे

भारतीय हवामानशास्त्र विभाग  नुसार, पुढील २ दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे

कोरोना लसीचा तिसरा डोस आता सर्वांना मिळणार नाही?

वेध माझा ऑनलाइन - देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट अद्याप कायम आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातील बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. दोन्ही डोस घेतलेले नागरिक आता बूस्टर डोसची वाट पाहत आहेत. सध्याच्या घडीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या ६० वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस दिला जात आहे. 
बूस्टर डोसबद्दलच्या धोरणावर सरकार पुनर्विचार करू शकतं. इतर वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस न देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. तिसऱ्या डोसचा नेमका फायदा काय याबद्दल तज्ज्ञांच्या मनात शंका आहे. 
आरोग्य कर्मचारी आणि आधीपासूनच एखाद्या गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना सध्याच्या लसीकरण धोरणानुसार बूस्टर डोस दिला जाईल 'बूस्टर डोसचा पुनर्विचार करावा लागेल. धोरणात बदल करण्याचा निर्णय सखोल अभ्यासानंतर घ्यावा लागेल. ज्या देशांमध्ये तिसरा डोस देण्यात आला आहे, तिथे त्याचे तितकेसे फायदे दिसलेले नाहीत,' असही तज्ञांचे मत आहे

कृष्णा अभिमत विद्यापीठात ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वेध माझा ऑनलाइन -  येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील सिक्युरिटी फोर्सचे जवान, विविध संस्थांतील विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन केले. 

कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या हस्ते व व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर डॉ. शिनगारे व डॉ. भोसले यांच्यासोबत सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षक आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेटस् कडून मानवंदना स्वीकारली. 

याप्रसंगी श्री. विनायक भोसले, सौ. गौरवी अतुल भोसले, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी मुख्य सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शानदार ध्वजसंचलन केले. याप्रसंगी कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस.  टी. मोहिते, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण, एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. एस. सी. काळे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. आर. सी. डोईजड, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी पाटील आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Wednesday, January 26, 2022

10 दिवसांत शरण या ; नितेश राणेना सुप्रीम कोर्टाचा आदेश...

वेध माझा ऑनलाइन - सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली आहे आणि तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाहीये.

सर्वोच्च न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यासोबतच 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर रहावं लागेल. त्यामुळे नितेश राणे हे 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर होऊन नियमित जामीन अर्ज दाखल करु शकणार आहेत. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे.

पुण्यात कोविडची स्थिती अद्यापही चिंताजनक...पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या दुप्पट...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच पुण्यातून कोरोनासंदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील सकारात्मकता दर भयावह करणारा आहे. महाराष्ट्रात उच्च जोखीम असलेल्या शहरांमध्ये कोविडची साप्ताहिक सकारात्मकता दरातून समोर आलं आहे की, पुण्यात मुंबई ठाणे , वर्धा, अकोला आणि नाशिकच्या तुलनेत सर्वांत जास्त सकारात्मकता दर 49.9 टक्के आहे. म्हणजेच पुण्याचा साप्ताहिक सकारात्मकता दर 49.9 टक्के आहे. हा दर गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या राज्याच्या सरासरी 24 टक्क्यांच्या दुप्पट आहे. महाराष्ट्रातील कोविड-19 प्रकरणांबाबत देशात चिंतेचे वातावरण आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, 17 ते 24 जानेवारी दरम्यान झालेल्या RT-PCR चाचणीद्वारे एकूण 84,902 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच वेळी, रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच PCR साठी एकूण 2.22 लाख नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये 97,838 लोक पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये साप्ताहिक सकारात्मकता दर जो गेल्या सात दिवसांची सरासरी आहे, हे दर्शविते की कोरोना व्हायरस खूप वेगानं पसरत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण..कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला सतेज पाटील यांची हजेरी

वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची लाट ओसरली असली तरी संकट अजूनही टळलेले नाही. सर्वसामान्यांपाठोपाठ राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पण, कोरोनाची लागण झाली असतानाही सतेज पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे समोर आले आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द सतेज पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.
'आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी' असं आवाहनही सतेज पाटील यांनी केलं.
विशेष म्हणजे काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सतेज पाटील हजर होते. एवढंच नाहीतर काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार स्व. चंद्रकांत जाधव यांच्या संकल्पनेतून हुतात्मा पार्क आणि महावीर उद्यान येथील विकास कामांचा शुभारंभ पार पडला. यावेळीही सतेज पाटील हजर होते.
महावीर गार्डन व हुतात्मा पार्कसाठी पहिल्या टप्यात एक-एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, दुसऱ्या टप्प्यात महावीर गार्डनसाठी दोन कोटी तर हुतात्मा पार्कसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सुशोभिकरणानंतर महावीर गार्डन व हुतात्मा पार्क पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरतील, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.
त्याआधी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक गोविंद सदाशिव जोशी व स्वातंत्र्य सैनिक वसंतराव ज्ञानदेव माने  यांच्या निवासस्थानी लावण्यात आलेल्या नामफलकाचे अनावरण आज करण्यात आले, याही कार्यक्रमाला सतेज पाटील हजर होते.

.

राज्यातील शाळा 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार ; मंत्री राजेश टोपेनी दिले संकेत

वेध माझा ऑनलाइन - कोरोनाची लाट ओसरत चालल्यामुळे पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालयाचे दार खुले होत आहे. राज्यातील महाविद्यालय १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अलीकडेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. पण, आता पालकांकडून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यास होकार दर्शवला आहे.

Tuesday, January 25, 2022

कराडच्या गब्बर ग्रुपच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी व अल्पोपहार वाटप...गब्बर ग्रुपच्या याही उपक्रमाचे सर्वत्र होतंय कौतुक...


वेध माझा ऑनलाइन - 
सामाजिक कार्यामध्ये जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या कराडच्या गब्बर ग्रुपच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी वाटप व अल्पोपहाराचा कार्यक्रम येथील दत्त चौक येथे आयोजित केला आहे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या ग्रुपच्या याही उपक्रमाचे कौतुक होताना दिसतय

कराडच्या गब्बर ग्रुपची अप्लावधीतच शहर व परिसरात मोठी ओळख निर्माण झाली आहे मधल्या कोविड काळात या ग्रुपने खूप मोठे काम उभे केले आहे रुग्ण ऍडमिट करण्यापासून त्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे बेड मिळवून देणे इंजेक्शनचा पूरवठा करण्यासाठी प्रयत्न करणे अगदी पेशंट डिस्चार्ज होईपर्यंत त्याची सेवा करण्याचे महत्वपूर्ण काम या ग्रुपने झालेल्या कोविड काळात यशस्वी पार पाडले आहे गोरगरिबांना लॉक डाऊन काळात गरजेच्या वस्तू धान्य वाटप अशा उपक्रमानाही या ग्रुपने शहरातून यशस्वीपणे व कौतुकास्पद साकारले आहे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यानी आवर्जून या ग्रुपचा नामोल्लेख करत कोविड काळात लोकांना मोलाची मदत केल्याच्या कारणाने या ग्रुपचा अभिमान वाटत असल्याचे सूतोवाच केले होते  
या ग्रुपने ऐन थंडीत रस्त्यावर किंवा स्टॅण्ड परिसरात कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांना त्या जागेवर जाऊन  ब्लॅंकेट वाटप केले आहे गोरगरिबांना लागणारी कोणतीही मदत असेल तर गब्बर ग्रुप नेहमीच ती मदत आनंदाने द्यायला पुढे सरसावला आहे या ग्रुपची कराड तालुक्यातील कोळे येथिल आश्रमाला दिलेली मदत असेल येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये रुग्णासाठी दिलेली गरजू वैद्यकीय सर्जिकल वस्तूंची मदत असेल तसेच कोविड काळात शहर व परिसरात उभ्या राहिलेल्या कोविड सेंटरना देखील या ग्रुपने  लागणारी वैद्यकीय वस्तू किंवा सर्जीकल वस्तूंची मदत केली आहे 

येथील पालिकेवर आर्थिक बोजा पडत असल्याच्या कारणाने शहराचा पाणी पुरवठा काही दिवसांपूर्वी एकवेळ करण्यात येणार असल्याचे येथील प्रशासनाने जाहीर केले होते मात्र हा प्रशासनाचा निर्णय याच ग्रुपच्या विनंतीला मान देत शहराच्या मुख्याधिकारी डाके यांनी मागे घेतलाय हे सर्वजणच जाणतात 

साजरे होणारे सण उत्सव साजरे करताना शहरातील लोकांना सामावून घेत एकदिलाने हे सण या ग्रुपच्या वतीने साजरे होत असतात आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून या ग्रुप ने येथील दत्त चौकात जिलेबी वाटप अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे देशप्रेमाने भारावलेली ऊर्जा घेऊन साजरा होणाऱ्या गबबर ग्रुपच्या या उपक्रमाचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे

आज जिल्ह्यात 921 बाधीत तर 1921 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 921 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1921 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 11कराड 281 खंडाळा 41 खटाव 48 कोरेगांव 47 माण 36 महाबळेश्वर 3 पाटण 25 फलटण 117 सातारा 221 वाई 44 व इतर 35आणि नंतरचे वाढीव 12असे  आज अखेर एकूण 921 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1921 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

पत्रकारांचे सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे स्वप्न अखेर साकारले - खा. उदयनराजेंनी शब्द पाळला : सातारा पालिका सभेत झाला ठराव

सातारा 
वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेले सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे स्वप्न अखेर साकारले आहे. 6 जानेवारी पत्रकार दिनी सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पत्रकार भवनाबाबत निर्णायक पावले उचलल्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी हाकेला साद दिली आणि सातार्‍यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोडोली येथील साई मंदिरानजिक सातारा नगरपालिकेने बांधलेल्या इमारतीला जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन असे नाव देण्याचा ठराव प्रशासकीय सभेत घेतला. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन कोरोनानंतर धुमधडाक्यात जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदनाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात जिल्हा पत्रकार भवन अस्तित्वात नव्हते. गेली अनेक वर्षे जिल्हा पत्रकार भवन व्हावे यासाठी नुसत्या चर्चा झडत होत्या. प्रत्यक्ष जिल्हा पत्रकार भवन आकाराला येत नव्हते. शहरातील प्रशासकीय जागांची पाहणीही यापूर्वीही अनेकदा पत्रकार भवनासाठी करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे जागाही उपलब्ध झाली नाही. यावर्षीच्या 6 जानेवारीला पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात यासदंर्भात कृतियुक्त पावले टाकण्याचा निर्णय जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, परिषदेचे प्रतिनिधी सुजित आंबेकर, प्रसिध्दी प्रमुख दिपक शिंदे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, जीवनधर चव्हाण, गजानन चेणगे, संदीप कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे तुषार तपासे, ओंकार कदम, सोशल मिडियाचे अध्यक्ष सनी शिंदे व समस्त पत्रकारांच्या उपस्थितीत घेण्यात आला. जिल्हा पत्रकार भवनाबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार याच कार्यक्रमात सर्वानुमते हरीष पाटणे आणि विनोद कुलकर्णी यांना देण्यात आले. पाटणे आणि कुलकर्णी यांनी कार्यक्रमानंतर लगेचच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे जिल्हा पत्रकार भवनासाठी इमारतीची मागणी केली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी तातडीने त्यात लक्ष घातले. पत्रकार दिनीच शुभेच्छा देताना ‘मीच तुम्हाला जिल्हा पत्रकार भवन देतो,’ असे त्यांनी सांगून टाकले. यासंदर्भात तातडीने इमारतीचा शोध घेण्याची सुचना त्यांनी नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिली. त्यानुसार सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील अकराही तालुक्यातून व जिल्ह्याबाहेरुनही येणार्‍या पत्रकारांसाठी सोयीचे ठिकाण ठरेल अशी गोडोली येथील साई मंदिरालगत असलेली सातारा नगरपालिकेने नुकतीच बांधून ठेवलेली  इमारत जिल्हा पत्रकार भवनासाठी सुचवण्यात आली. चार मजली असलेल्या या इमारतीचा काही भाग साहित्य परिषदेलाही देण्यात यावा अशी मागणी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनेही केली. त्यानुसार या इमारतीला ‘जिल्हा पत्रकार भवन’ व ‘साहित्य सदन’ असे नाव देण्याचा ठराव सोमवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला.
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था, त्याखालच्या मजल्यावर पत्रकारांचे कार्यक्रम व पत्रकार परिषदा यासाठी हॉल, त्याखालच्या मजल्यावर सुसज्ज ग्रंथालय व तळमजल्यावर साहित्य परिषदेच्या उपक्रमांसाठी हॉल अशी रचना ठरवण्यात आली आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना ही संकल्पना कमालीची भावली असून त्यांनीही याबाबतच्या प्रक्रिया अपूर्ण असतील तर तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सध्या कोरोनाचा कालावधी आहे. कोरोनाचा कालावधी संपताच व इमारतीची रंगरंगोटी, सुशोभिकरण, निवास व्यवस्था व अन्य बाबींची पूर्तता करुन लवकरच धुमधडाक्यात सातारा जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन या इमारतीचे उद्घाटन व पत्रकारार्पण केले जाईल, अशी माहिती पाटणे व कुलकर्णी यांनी दिली.


जिल्ह्यातील पत्रकारांच्या उपयोगी पडलो याचे मोठे समाधान : खा. श्री. छ. उदयनराजे

सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी माझ्यावर जिवापाड प्रेम केले आहे. माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. सातारां जिल्हा पत्रकार भवनाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळला होता. मला माहित होतं, पत्रकारांचा अनेकजण फक्त वापर करुन घेतात. पत्रकारांना देण्याची वेळ येते तेव्हा सर्वांची चुप्पी असते. माझे मात्र ओठात एक, पोटात एक असे काही नसते. माझ्या मित्रांनी मला जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जिल्हा पत्रकार भवन मागितले आणि मी ते तातडीने देवू शकलो यातच फार मोठे समाधान आहे. लवकरच इमारतीतील अपुर्‍या बाबी पूर्ण करुन सुसज्ज असे जिल्हा पत्रकार भवन पत्रकारांच्या ताब्यात देवू, अशी प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

मराठी पत्रकार परिषदेने मला सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षपद दिले. पत्रकारांची आंदोलने, सामाजिक उपक्रम, गोरगरीब पत्रकारांना मदत असे काम जिल्ह्यातील सहकार्‍यांच्या मदतीने आतापर्यंत आम्ही करत आलो आहोत. या सर्व वाटचालीत जिल्हा पत्रकार भवन नाही याची खंत मनाला सातत्याने बोचत होती. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावे हे आपले स्वप्न होते. संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह सर्व सहकार्‍यांनी टाकलेल्या विश्वासाला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी साथ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो पत्रकारांचे स्वप्न साकारले जात आहे. माझ्या वैयक्तिक पत्रकारितेच्या संघटनात्मक वाटचालीत जिल्हा पत्रकार भवन ही कायमस्वरुपी नोंद राहिल याचा मला अभिमान आहे.
-हरीष पाटणे अध्यक्ष,
सातारा जिल्हा पत्रकार संघ

6 जानेवारीला पत्रकार दिनी सातार्‍यात जिल्हा पत्रकार भवन उभे करुन देण्याची जबाबदारी हरीष पाटणे व माझ्यावर सहकार्‍यांनी टाकली होती. याबाबत आम्ही तातडीने पावले उचलली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, सातारा पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आम्ही त्याच दिवशी दिलेल्या अर्जावर विचार केला. नगरपालिका सभेत ठराव करुन ही इमारत जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन म्हणून पत्रकारिता व साहित्यविषयक उपक्रमांसाठी आम्हाला दिली जात असल्याचा निश्चितपणे आनंद व अभिमान वाटतो. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यात त्यांचा मित्र म्हणून मला कृतीयुक्त सहभाग नोंदवता आला याचा अभिमान वाटतो.
विनोद कुलकर्णी
अध्यक्ष सातारा पत्रकार संघ
अध्यक्ष, साहित्य परिषद शाखा (शाहूपुरी)

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल ; नवाब मलिक यांची शेलकी टीका... सम्पूर्ण राज्यभरात चर्चा सुरु...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. नवाब मलिक यांनी म्हटले की, एखाद्या चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटात आयटम गर्लची आवश्यकता असते. किरिट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका मलिक यांनी केली.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली होती. या पक्षांच्या काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाईदेखील सुरू केली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीकडूनही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीकडूनही मलिक यांनी भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले होते. अंमली पदार्थ सेवन प्रकरणात मलिक यांनी भाजप नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. 
नांदेड येथे मलिक यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांना अँटमगर्ल संबोधल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Monday, January 24, 2022

राज्य मागास आयोगाने तातडीने ओ बी सी बाबतचा अहवाल द्यावा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आयोगास सूचना...

वेध माझा ऑनलाइन - इतर मागास प्रवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार या समाजाचे राजकीय मागासलेपण दर्शविणारी आकडेवाडी सरकारने गोळा केली असून सोमवारी ती राज्य मागासवर्ग आयोगाला सुपूर्द करण्यात आली. त्यानुसार आयोगाने तातडीने अहवाल द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगास दिल्याचे समजते. त्याच वेळी आयोगाला आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण कायम राहू शकेल अशी आकडेवारी आणि तपशील सरकारकडे उपलब्ध असल्याचा दावा राज्य सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला होता. त्या वेळी हा सांखिकी तपशील राज्य मागासवर्ग आयोगाकडे द्या.आयोगाने या माहितीची अचूकता तपासावी आणि शिफारशी कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मागासवर्ग आयोगाशी चर्चा केली. सह्यादी अतिथिगृहावर झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुड़े, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ओबीसी विकासमंत्री विजय वडे्ट्टीवार, अन्न व नागरीपुवठामंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ िशदे, परिवहनमंत्री अनिल परब तसेच आयोगाचे सदस्य आदी उपस्थित होते.  बैठकीत ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय मागासलेपणाबाबतचा सांख्यिकी तपशील मांडला. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या सप्टेंबर २०२१मध्ये प्रसिद्ध झालेल्या ७७ व्या अहवालानुसार  राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३९.९ टक्के शेतकरी कुटुंब इतर मागास प्रवर्गातील आहेत. तर बिगर शेतकरी कुटुंबातील ३९.६ टक्के कुटुंब ओबीसी समाजातील आहेत. केंद्राच्या समाज  कल्याण विभागाच्या मार्च २०२१मधील अहवालानुसार राज्यातील इतर मागासांची लोकसंख्या ३३.८ टक्के आहे. अशाच प्रकारे केंद्राच्याच शैक्षणिकदृष्टय़ा एकात्मिक जिल्हा महिती व्यवस्थापन अहवालानुसार राज्यातील ३३ टक्के विद्यार्थी हे इतर मागास प्रवर्गातील आहेत. तर राज्य सरकारनेच गठित केलेल्या गोखले  इन्स्टिटय़ूट ऑफ  पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालातही  राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ४८.६ टक्के लोकसंख्या ही इतर मागास प्रवर्गाची असल्याचे या वेळी आयोगाच्या निदर्शनास आणण्यात आले. तसेच हा सर्व सांख्यिकी दस्तावेज आयोगाकडे सुपुूर्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर येत्या मार्चमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने आपल्या कामाला गती देऊन लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी आयोगानेही आपल्या अडचणींचा पाढा वाचताना, आयोगाचे कामकाज करण्यासाठी कर्मचारीच नसून किमान ३५ कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, तसेच पूर्णवेळ सचिव द्यावा, सुविधायुक्त कार्यालय त्वरित उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या केल्या. त्याची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना ठाकरे यांनी प्रशासनास दिल्या. तसेच आयोग आणि सरकार यांच्यात समन्वय साधून आयोगाचे काम गतिमान करण्याची जबाबादारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांच्यावर सोपविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

वेधमाझा च्या वृत्ताची प्रशासनाकडून ताबडतोब दखल ; जुन्या कोयना पुलावरील हलक्या वाहनांची वाहतुक ताबडतोब केली बंद ; शहर व परिसरातून वेधमाझा चे होतय अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलावरून हलक्या तीन चार चाकी वाहनांची वाहतूक सुरू होणार असल्याबाबतचे विधान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केले होते मात्र त्यापूर्वी तेथील रस्त्याचे दुतर्फा काम होणे गरजेचे आहे मात्र त्याअगोदरच आज या पुलावरून ही हलकी वाहने जाताना दिसली त्यामुळे या वाहनांना त्या पुलावरून रहृदरीसाठी परवानगी मिळाली आहे का? कोणी दिली ? असा सवाल वेध माझा ने केला होता त्यानंतर लगेचच येथील प्रशासनाने दखल घेत हा रस्ता या वाहनांसाठी त्वरित बंद केला... वेध माझाने ही बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे वेळीच डोळे उघडल्याबद्दल कराडकरांनी वेध माझाला धन्यवादही दिले  

जुन्या कोयनापुलाच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच या पुलावरून तीन, चार चाकी  हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मात्र तोपर्यंतच या पुलावरून ही वाहने ये जा करू लागल्याने या वाहनांना या ठिकाणाहून रहदारीसाठी कोणी परवानगी दिली ? विनापरवानगी हे लोक या पुलावरून वाहतूक करत आहेत का ? अधिकारीवर्गाचे याकडे दुर्लक्ष का होतय ? हा रस्ता वाहतुकीला खुला केला असेल तर अधिकाऱ्यांनी तसे सांगून टाका... आणि नसेल तर मात्र येथील वाहतूक त्वरित थांबवा... असे सांगत वेध माझाच्या वृत्ताने प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले होते वेध माझा ऑनलाइनचा वाचक खूप मोठया प्रमाणात आहे त्यामुळे बातमी वाऱ्यासारखी पसरली या बातमीची सर्वत्र चर्चाही झाली अनेकांकडून याविषयी विचारणादेखील झाली त्यानंतर लगेचच प्रशासनाकडून दखल घेत तो रस्ता व त्याठिकाची वाहतूक त्वरित बंद करण्यात आली  एकूणच घडलेल्या या झटपट घडामोडीमुळे वेध माझा ऑनलाइनचे शहर व परिसरातून सर्वत्र कौतुक होताना दिसतंय...कराडकरांनी वेध माझाला धन्यवादही दिलेत...वेध माझाचे अभिनंदनही केलंय...

राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत 27 जानेवारीला...

वेध माझा ऑनलाइन - सम्पूर्ण राज्यातील नगरपंचायतीच्या एकूण 139 नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत गुरुवार दि 27 जानेवारी रोजी मुंबई येथील नगरविकास विभाग येथे निघणार आहे.दरम्यान, कोरोनामुळे असलेले निर्बंध पाहता या सोडतीसाठी संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहतील तसेच ऑनलाईन उपस्थितिसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था करतील व ही सोडत अधिकारीवर्ग व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दहा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सादर होईल त्यासाठी संबंधितांनी विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहायचं आहे अस संबंधित विभागाकडून कळवण्यात आले आहे

थंडीचा कडाका पुढच्या काही दिवसात आणखी वाढणार ; हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात सध्या थंडीचा कडाका जास्त आहे. तापमान कमी जास्त होत असलं तरी थंडी मात्र कायम आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. तर २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होतं. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणाऱ्या वेगवान वाऱ्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती ठळकपणे जाणवली, तर सौराष्ट्राकडून धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतल्या अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला होता.

जुन्या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू?


संग्रहित छायाचित्र

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होणार असल्याबाबतचे विधान  आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केले होते मात्र त्यापूर्वी तेथील रस्त्याचे दुतर्फा काम होणे गरजेचे आहे मात्र त्याअगोदरच आज या पुलावरून हलकी वाहने जाताना दिसली त्यामुळे या वाहनांना त्या पुलावरून रहृदरीसाठी परवानगी मिळाली आहे का? कोणी दिली ? का संबंधित खात्याच्या दुर्लक्षित पणामुळे येथून प्रवास करणे या वाहनधारकांना शक्य झाले का? अशा अनेक चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत

दरम्यान त्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मात्र तोपर्यंतच या पुलावरून हलकी वाहने ये जा करू लागल्याने या वाहनांना या ठिकाणाहून रहदारीसाठी कोणी परवानगी दिली ? का... विनापरवानगी हे लोक या पुलावरून वाहतूक करत आहेत ? याबाबतचा काहीच खुलासा अद्याप झालेला नाही त्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाने याकडे लक्ष देऊन याबाबत योग्य ते सांगणे गरजेचे आहे अन्यथा एकाचे बघून दुसरा असे एका मागोमाग एक  गाडी चालक त्याठिकान्हून आपली गाडी विनापरवाना घेऊन जाण्याची प्रक्रिया यापुढेही अशीच चालूच ठेवतील अशी चर्चा आहे तसेच तिथून जर रहृदरीसाठी परवानगी दिली असेलच तर मग तसे संबंधित खात्याने जाहीरही करून टाकावे अशीही चर्चा आहे

"शिक्षण मंडळ कराड' ची निवडणूक बिनविरोध...

वेध माझा ऑनलाइन - ‘शिक्षण मंडळ कराड’ या महाराष्ट्रातील ख्यातनाम शिक्षण संस्थेच्या ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी होणारी निवडणूक बिनविरोध पार पडली.

संस्थेच्या घटनेनुसार बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आश्रयदाते व सहाय्यक या प्रवर्गातून प्रत्येकी पाच तसेच सर्वसामान्य प्रवर्गातून तीन अशा १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जेवढी पदे तेवढेच वैध अर्ज शिल्लक राहिल्याने खालील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.

आश्रयदाते प्रवर्ग – 
भा. म. तथा बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. माधव कुमठेकर व ऍड. विक्रम कुलकर्णी.

सहाय्यक प्रवर्ग – 
अनघा परांडकर, ऍड. अरविंद घाटे, ऍड. बळवंत बुधकर, सुधीर घाटे, डॉ. मीना पेंढारकर.

सर्वसामान्य प्रवर्ग – 
राजेंद्र लाटकर, काशिनाथ कुलकर्णी व उदय थोरात हे सदस्य कौन्सिल मेंबर या पदासाठी बिनविरोध निवडून आले.

कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे शिक्षण मंडळाची शताब्दी साधेपणाने साजरी करण्यात आली. आगामी काळात कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर संस्था शताब्दीचा सोहळा दिमाखात साजरा करणार आहे. संस्था स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम अंमलात आणून यापुढेही संस्था सक्षम पायावर वृद्धिंगत करण्यासाठी नूतन सर्व संचालक कार्यरत राहील असे बाळासाहेब कुलकर्णी व चंद्रशेखर देशपांडे, यांनी सांगितले

आज जिल्ह्यात 1134 बाधीत,976 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1134 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 976 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 19 कराड 196 खंडाळा 87 खटाव 90 कोरेगांव 64 माण 39 महाबळेश्वर 15 पाटण 36 फलटण 144 सातारा 348 वाई 56 व इतर 29आणि नंतरचे वाढीव 11 असे  आज अखेर एकूण 1134 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 976 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

शिवसेनेच्यावतीने शिवराय दुर्गभ्रमण मंडळाच्या दुर्गप्रेमी मावळ्यांचा सन्मान...निमित्त शिवराय दुर्गभ्रमण मंडळाच्या रौप्य महोत्सवाचे

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील शनिवार पेठेतील शिवराय दुर्गभ्रमण मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त कराड तालुका शिवसेनेच्यावतीने सर्व दुर्गप्रेमी मावळ्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कराड तहसील कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला.
शिवराय दुर्गभ्रमण मंडळाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे.मंडळाचे मार्गदर्शक व इतिहासाचे गाढे अभ्यासक के. एन. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षात सदस्यांनी महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातील तब्बल 165 गडकोट किल्ले पूर्ण केले आहेत. शिवराय दुर्गभ्रमण मंडळाच्या दुर्गप्रेमाची दखल घेऊन कराड तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कराड तहसील कार्यालयात सर्व दुर्गप्रेमी कार्यकर्त्यांचा शिवसेना पदाधिकार्‍यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी दादा पवार, सुनील घोरपडे,सचिन देसाई, महेश सुर्यवंशी, रुपेश देसाई, अजित घोरपडे, सयाजी माने, महेश चव्हाण, रवींद्र देसाई, सतीश मुळीक, संजय मुळीक, इंजोजीराव शेडगे, धनंजय मुळीक, अ‍ॅड.सचिन देसाई, गणेश देसाई यांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक,  उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, संजय गायकवाड, सुनिल पाटील, शंकर वीर, माजी शहरप्रमुख प्रमोद वेर्णेकर, राजेंद्र माने, विभागप्रमुख प्रविण लोहार आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत काकासाहेब जाधव यांनी केले. तर आभार महेश सुर्यवंशी यांनी मानले.

कृष्णा उद्योग समूहाकडून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याचे कार्य ; आ. मानसिंगराव नाईक यांचे तांबवे येथे जयवंतराव भोसले पतसंस्थेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी गौरवोद्गार...

वेध माझा ऑनलाइन  -  कृष्णा उद्योग समूहाने आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून कराडसह वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. तांबवे (ता. वाळवा) येथे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या १९ व्या आणि सांगली जिल्ह्यातील पहिल्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

आ. नाईक यांच्या हस्ते आणि सांगली जि.प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील व पतसंस्थेचे संस्थापक तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या नूतन शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, दीपक पाटील, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आ. नाईक म्हणाले, स्व. आप्पासाहेबांनी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून दिली. त्यांच्याच विचाराने वाटचाल करत कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी नेहमीच सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला सहकार्य केले आहे. कृष्णा हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेचा लाभही या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. पतसंस्थेच्या नूतन शाखेमुळे या भागातील लोकांची आर्थिक गरज पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल, असा मला विश्वास वाटतो.

पतसंस्थेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले, की गेल्या २० वर्षांत आमच्या पतसंस्थेने सभासदाभिमुख कारभार केला आहे. आजअखेर संस्थेने ३५० कोटींचा व्यवसाय केला असून, येत्या २ महिन्यात ४०० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच येत्या काळात संस्थेचा विस्तार करून, लोकांना त्यांच्या विविध गरजांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी संचालक ब्रम्हानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले. धोत्रेवाडीचे माजी सरपंच प्रदीप माने यांनी आभार मानले. यावेळी तांबवेच्या सरपंच सुषमा भंडारे, धोत्रेवाडीच्या सरपंच वनिता माळी, वाळवा तालुका बाजार समितीचे माजी सदस्य तानाजीराव मोरे, माजी उपसरपंच के. डी. शेळके, पोपटराव जगताप, रामभाऊ माळी, के. के. पाटील, शिवाजी पाटील, मोहनराव जाधव, प्रमोद पाटील, अशोक मोरे, विलास जाधव, विजयकुमार नलवडे, पैलवान संभाजी मोहिते, संभाजी जाधव, धनाजी जाधव, गुलाब चव्हाण, विजय कारंडे, गिरीश जाधव, पोपटराव पवार, वसीम मुल्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 


ओबीसी आरक्षण विषयी मुख्यमंत्रांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक...बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

वेध माझा ऑनलाइन  - राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणावरून मंथन सुरू आहे. अशातच आज सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक घेत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे यावरही या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षणाबाबतची बैठक ठेवली आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक डेटा, राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाचं कामकाज आणि पुढील बैठकीत सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद करायचा अशा अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणावर राज्य मागासवर्ग आयोग निर्णय घेणार

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय दिलाय. मार्चमध्ये होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणासह होणार की नाही याचा निर्णय आता राज्याने नेमलेले राज्य मागासवर्ग आयोग घेणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा त्यांनी आयोगाला द्यावा त्यानंतर आयोग दोन आठवड्यात त्या डेटावर आरक्षण तात्पुरते देता येईल की नाही हे कळवणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही हे आयोगाच्या निर्णयावर आणि दोन आठवड्यात ठरणार आहे. ही तात्पुरती सोय केवळ आत्ताच्या निवडणुकांपुरती असणार आहे.

…तोपर्यंत भविष्यातल्या सगळ्या निवडणुकांसाठी ओबीसी जागा खुल्या प्रवर्गातील मानणार”

८ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात यासंदर्भात पुढची सुनावणी आहे. पण जोपर्यंत राज्य सरकार कोर्टाने सांगितलेल्या त्रिसुत्रीचं पालन करत नाही तोपर्यंत भविष्यातल्या सगळ्या निवडणुकांसाठी ओबीसी जागा खुल्या प्रवर्गातील मानल्या जाणार आहेत. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने त्यांच्याकडील डाटा राज्य मागासवर्गीय आयोगाला द्यावा आणि आयोग तो डाटा पाहून तात्पुरत्या स्वरूपात आगामी निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण देता येईल का? हे ठरवेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर कृष्णा हॉस्पिटलकडून मोफत उपचार...डॉ अतुल भोसलेंकडून पित्याच्या धाडसाचे कौतुक...तर "त्या' जखमी मुलाच्या प्रकृतीची अतुलबाबानी केली विचारपूस...

वेध माझा ऑनलाइन -  किरपे (ता. कराड) येथील राज धनाजी देवकर (वय ५ वर्षे) या शेतकऱ्याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. या जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून, या मुलावरील उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे. दरम्यान डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, बिबट्याशी झुंज देणाऱ्या मुलाच्या वडिलांच्या धाडसाचे कौतुकही केले आहे. 

किरपे येथे २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास शेतीकामासाठी वडिलांसोबत गेलेल्या राज धनंजय देवकर ( वय ५ वर्षे) या मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मानेला पकडून शेतात फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी वडील धनंजय देवकर यांनी बिबट्याशी दोन हात करत आपल्या मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सहीसलामत सोडविले. मात्र या झटापटीत मुलाच्या मानेला व शरीरावर जखमा झाल्या असून, त्याला उपचारासाठी तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

या प्रकाराची माहिती समजताच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी जखमी मुलाच्या प्रकृतीची चौकशी करून, त्याच्यावरील उपचारांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. तसेच बिबट्याशी झुंज देणाऱ्या वडिलांच्या धाडसाचे कौतुक करत, या मुलावरील वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
***

शरद पवारांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती :

वेध माझा ऑनलाइन -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे.

 शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं पवारांनी म्हटलं आहे. 
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..!  आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.