Friday, January 21, 2022

पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या धाडसी पित्याचे कौतुक करीत मुलाची केली विचारपूस... बिबट्याच्या वाढत्या घटनांबाबत विविध मागण्यांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वेध माझा ऑनलाइन -  कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलाला वाचविले या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीरही दिला. 

आ.चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या पित्याची चौकशी केली व त्यांना धीर देत मुलाच्या उपचाराचा खर्च शासन करेल असे सांगितले. तसेच आ.चव्हाण यांनी वनअधिकाऱ्यांशी चर्चा करीत बिबट्याचा वारंवार होत असलेला उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्याना पकडून जंगलात सोडण्याची व्यवस्था करावी. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच या बाबत स्वतः आ.चव्हाण सुद्धा पाठपुरावा करणार आहेत. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागात जाऊन तेथील ग्रामस्थांचे भीतीचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चर्चा कराव्यात, तसेच पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे अश्या काही सूचना आ. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

बिबट्याचा मानवी वस्तीत वाढत असलेला वावर यासाठी आ.चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करीत वनविभागाकडून योग्य उपाययोजना बिबट्याचा वावर असलेल्या भागात केल्या जाव्यात. तसेच वनविभागाच्या तालुका अधिकाऱ्यांना पिंजरे लावण्याचे अधिकार दिले जावेत तसेच कराड तालुक्यात संक्रमण उपचार केंद्र उभारण्याचा वनविभागाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यास तात्काळ मंजुरी मिळावी अश्या काही मागण्या या पत्रात आहेत.

No comments:

Post a Comment