वेध माझा ऑनलाइन - भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक मोठा धक्का बसला आहे. कारण, या निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे हे पराभूत झाले आहेत. रमेश डोंगरे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. रमेश डोंगरे हे नाना पटोलेंचे खंदे समर्थक आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष असूनही पराभूत झाल्याने काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
भंडारा जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असलेले रमेश डोंगरे हे भागडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपच्या प्रियांक बोरकर यांनी रमेश डोंगरे यांचा पराभव केला आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांपैकी आतापर्यंत 22 जागांचे निकाल हाती आले आहेत.
No comments:
Post a Comment