Friday, January 28, 2022

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' आला आढळून ; .संक्रमित झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो...शास्त्रज्ञांचा दावा...

वेध माझा ऑनलाइन - चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी आता नवीन कोरोना व्हायरस 'निओकोव्ह'बाबत भीतीदायक बातमी दिली आहे. 2019 मध्ये वुहानमधूनच कोरोना व्हायरस जगभर पसरला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' आढळला आहे. याचे संक्रमण आणि मृत्यू दर दोन्हीही खूप जास्त आहेत. यामुळे संक्रमित झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो, असे तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. 

वुहानच्या शास्त्रज्ञांचा हा दावा स्पुतनिक या रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग आधीच घाबरले आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने धूमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत 'निओकोव्ह' चिंता वाढवू शकतो. 'निओकोव्ह' व्हायरस नवीन नाही, असेही अहवालात म्हटले आहे. 
दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये 'निओकोव्ह' व्हायरस आढळून आला आहे, तो सध्या फक्त याच पक्ष्यांमध्ये पसरतो, हा व्हायरस माणसांना देखील संक्रमित करू शकतो.

No comments:

Post a Comment