येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने सन 2017 व 2018 या सालात केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेत नगरपालिका गटात राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या समितीला घोषित केला आहे. 2017 पासून सभापती सौ स्मिता हुलवान यांनी सलग चार वर्षे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद भुषवले आहे. या पुरस्कारामुळे सभापती म्हणून सौ. हुलवान यांनी केलेल्या कामाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर परिषद, नगरपरिषद महासंघ यांनी 2014 सालापासून राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱया महिला व बालकल्याण समित्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला सन 2017-18 या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी राज्यातील पालिकांच्या महिला व बालकल्याण समित्यांकडून विहित नमुन्यात माहिती मागवण्यात आली होती. पुरस्कारासाठी समित्यांची निवड करण्यासाठी अनुभवी नगरसेविकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने ब वर्गात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीस राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे.
यानिजित्ताने येथील पालिकेतील सत्तारूढ यशवंत विकास आघाडीने सौ हुलवान यांचा नुकताच सत्कार केला सौ हुलवान यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे
No comments:
Post a Comment