Monday, January 31, 2022

बंध माझा ऑनलाइन - राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद जळगाव याठिकाणी करण्यात आली आहे. काल येथील तापमान 5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. जळगावसोबतच उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता. त्यानंतर आजही उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत थंडीची लाट कायम राहणार असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आज एकूण 9 जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने आज नाशिकसह, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांत थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. आस सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात थंडगार वारे वाहत आहे. मध्य रात्री आणि पहाटे याठिकाणी धुक्यासह कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान एक अंकी नोंदण्याची शक्यता आहे

No comments:

Post a Comment