वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यावर घोंघावणारं अवकाळी पावसाचं सावट दूर झालं आहे. पुढील पाच दिवस राज्यात कुठेही पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पण सध्या उत्तर आणि पश्चिम भारतात मात्र थंडीने कहर केला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली गेला आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा परिसरात मात्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लहर तर पूर्वेतील काही राज्यात पावसाचा कहर सुरू असताना, महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.
हवामान खात्याने आज तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. तर उद्या आंध्र प्रदेश आणि रायलसीमा याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पुढील तीन दिवस तामिळनाडू, केरळ आणि माहे याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे.
उत्तर भारतात थंडीची लहर तर पूर्वेतील काही राज्यात पावसाचा कहर सुरू असताना, महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. आज पुणे जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद पाषाण याठिकाणी झाली आहे. याठिकाणी किमान तापमानाचा पारा 10.9 अंशावर पोहोचला होता. त्यापाठोपाठ हवेली (11), राजगुरूनगर (11), एनडीए (11.3), माळीण (117), शिवाजीनगर (12.1) आणि तळेगाव येथे 12.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment