Monday, January 31, 2022

कराड तालुक्यातील तारुख येथील शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने त्या परिसरात धास्ती...

वेध माझा ऑनलाइन - 
तारुख ता. कराड येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज दुपारी  ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात  बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आज दूपारी पिलले दृष्टीस पडताच शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना याबाबतची माहिती दिली.भिसे यांनी लगेचच वनाधिकारी यासह  मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना याबाबत माहिती देत सदर पिले ताब्यात घेतली.

दरम्यान ही बिबट्या मादी तिथे जवळपासच होती ती पिलाशिवाय आक्रमक होऊ नये म्हणून सदर तीन पिलांची आईसह भेट घडवून आणण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले त्यानूसार सायंकाळी त्याच शेतात ही तीन पिल्ले एका कॅरेट मध्ये घालून त्याच्या आसपास कॅमेरे लावण्यात आले. त्याचवेळी बिबट्याची मादी तिथेच निदर्शनास आली, ती परिसरात घुटमळतच होती  नंतर पिलांना कॅरेट मध्ये ठेवून वनअधिकारी जागेवरून निघून गेले. 
यावेळी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक रमेश जाधव, भारत खटावकर, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment