Saturday, January 29, 2022

पुण्यात शाळा सुरु करण्याचा झाला निर्णय ; कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचं आजचे पुण्यातील चित्र ; आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी ; शाळा सुरु करण्याच्या निर्णय प्रशासन मागे घेतं का हे पाहणं ठरणार महत्वाच...

वेध माझा ऑनलाइन - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुण्यातही थैमान घातलं आहे. विशेष पुण्यातील कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ ही कमी झाल्याचं चित्र होतं. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं पाहून प्रशासनाने आज सकाळी शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही तासात एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झाला म्हणून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुसरीकडे पुण्यात आज कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढल्याचं चित्र आहे. कारण पुण्यातील आजची नवी कोरोनाबाधितांची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 410 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे काल ही आकडेवारी जवळपास साडे तीनहजार होती. पण हीच आकडेवारी आज दोन हजारांनी वाढली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णय प्रशासन मागे घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरु होणार आहेत.

पुण्यात आज दिवसभरात 5 हजार 410 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आज पुण्यात तब्बल 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील 7 तर पुण्याबाहेरील 8 मृतकांचा समावेश आहे. पुण्यात सध्या 358 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर 51 रुग्ण हे इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि 33 रुग्ण नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील सध्याची सक्रिय रुग्णसंख्या ही 33 हजार 528 इतकी आहे. दुसरीकडे पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दररोज कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीदेखील संख्या वाढू लागली आहे. पुण्यात आज दिवसभरात 8 हजार 215 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय

पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत माहिती दिली. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण ग्रामीण भागात चांगले सुरू आहे. 1 फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयातील तरुण-तरुणींनी दोन्ही डोस घ्यायला हवेत. 9वीपासून शाळा सुरू होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

पहिली ते आठवीचे वर्ग चार तासच
9वी पासून पुढचे सर्व वर्ग पूर्ण वेळेत भरवण्यात येणार आहेत. तर पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जाणार असल्याची माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment