वेध माझा ऑनलाइन - अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात भूमिकेला योग्य न्याय दिलाय...
मात्र अमोल कोल्हे यांनी भावनिक होऊ नये व कलाकाराने भावनेपोटी आत्मक्लेश करुन दिलगिरी व्यक्त करण्याची मुळीच गरज नाही...
कलेचं राजकारण होऊ नये व करु नये
हे माझं परखड आहे असे अभिनेता दिगदर्शक जुगलकिशोर ओझा यांनी याविषयी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरमधील खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली. शिवाय, या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला गेला. तर, अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला. याविषयी विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत राजकीय क्षेत्राबरोबर कला क्षेत्रातूनदेखील याविषयी अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात अभिनेता दिगदर्शक जुगलकिशोर ओझा यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे कलेचे राजकारण होऊ देता कामा नये असे सांगत अमोल कोल्हे यांनी भावनिक होऊ नये व कलाकाराने भावने पोटी आत्मक्लेश करुन दिलगिरी व्यक्त करण्याची मुळीच गरज नाही असे या विषयासंबंधीचे आपले मत ओझा यांनी व्यक्त केलं आहे
-
No comments:
Post a Comment