वेध माझा ऑनलाइन - वाढीव वॉर्डांसह मुंबईतील प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा निश्चित करणे आणि बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार २ मार्चला अंतिम आराखडा प्रसिद्ध केला होईल. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमधील शाळा- कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्यात मुंबईसह २० महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कालावधी ८ मार्चला संपुष्टात येईल. त्यामुळे त्याआधी अर्थात फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील, अशी शक्यता होती. मात्र, प्रारूप आराखडा अंतिम करणे, बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमांकनाची प्रक्रियाच २ मार्चपर्यंत चालणार आहे. हा टप्पा पार पडल्यानंतर संबंधित महापालिकांतील आरक्षणाची सोडत जाहीर करणे आणि आचारसंहिता असा कार्यक्रम असतो. त्यामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रभागांची संख्या नऊने वाढविण्यात आल्याने आता ती २२७ वरून २३६ झाली आहे. २३६ पैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतील, तर अनुसूचित जाती १५ आणि अनुसूचित जमातींसाठी २ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
असा असेल कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार १ फेब्रुवारीला प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्याचा कालावधी आहे. २६ फेब्रुवारीला या हरकती-सूचनांवर सुनावणी घेतली जाईल. २ मार्चला याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे. मुंबईसह ठाणे आणि अन्य महापालिकांसाठीही असाच कार्यक्रम आहे.
ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित करीत ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारने या मर्यादेत २७ टक्के आरक्षणाचा निर्णय दिला. मात्र, इम्पिरिकल डेटाशिवाय आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने हा निर्णयही फेटाळून लावला आहे. यासंदर्भातील सुनावणीनंतर ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार
No comments:
Post a Comment