वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत चालली आहे. ओमायक्रॉनचाही धोका आता टळलेला आहे. त्यातच आता गेल्या दोन वर्षांपासून ज्या कोरोनाच्या संकटाशी आपण लढा देत आहोत, तो मार्चच्या मध्यवधीपर्यंत संपुष्टात येऊ शकतो, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पंढपूरच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनीविठ्ठलरुक्मिणीचे दर्शन घेत लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.
'कोरोनाचा न्युकॉन हा नवा व्हेरीएंट पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पण राज्यातील सद्य स्थितीआधारे तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
No comments:
Post a Comment