Thursday, January 27, 2022

कोरोना लसीचा तिसरा डोस आता सर्वांना मिळणार नाही?

वेध माझा ऑनलाइन - देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट अद्याप कायम आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातील बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. दोन्ही डोस घेतलेले नागरिक आता बूस्टर डोसची वाट पाहत आहेत. सध्याच्या घडीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या ६० वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस दिला जात आहे. 
बूस्टर डोसबद्दलच्या धोरणावर सरकार पुनर्विचार करू शकतं. इतर वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस न देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. तिसऱ्या डोसचा नेमका फायदा काय याबद्दल तज्ज्ञांच्या मनात शंका आहे. 
आरोग्य कर्मचारी आणि आधीपासूनच एखाद्या गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना सध्याच्या लसीकरण धोरणानुसार बूस्टर डोस दिला जाईल 'बूस्टर डोसचा पुनर्विचार करावा लागेल. धोरणात बदल करण्याचा निर्णय सखोल अभ्यासानंतर घ्यावा लागेल. ज्या देशांमध्ये तिसरा डोस देण्यात आला आहे, तिथे त्याचे तितकेसे फायदे दिसलेले नाहीत,' असही तज्ञांचे मत आहे

No comments:

Post a Comment