Wednesday, January 19, 2022

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल याना मोठा धक्का

वेध माझा ऑनलाइन - गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा पराभव झाला आहे. डव्वा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर पराभूत झाले आहेत. तर भाजपचे बी एम पटले हे विजयी झाले आहेत. गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच जिल्हा परिषद सदस्य तर काँग्रेसचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.

गंगाधर परशुरामकर हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन महिन्यांपूर्वी गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी काही कारणास्तव जिल्हाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बातचित केली होती. अखेर प्रफुल्ल पटेल यांच्या सुचनेनुसार जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते गंगाधर परशुरामकर यांच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती.

No comments:

Post a Comment