Wednesday, January 19, 2022

पाटणकर गटाने १७ पैकी तब्बल १५ जागांवर मिळवले यश ; पाटण नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे वर्चस्व सिद्ध ; गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई याना झटका

वेध माझा ऑनलाइन - पाटण नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवाद प्रस्थापित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटणकर गटाने १७ पैकी तब्बल १५ जागांवर यश मिळवले आहे. तर सेनेचे राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाला अवघ्या दोन जागांवर यश मिळालेले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या ना. शंभूराज देसाई यांना येथे जबरदस्त धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची जिल्हा बँकेनंतरची विजयाची अखंडित परंपरा यापुढेही कायम राहील, असा सर्व स्तरातून विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपा, काँग्रेस आणि अपक्ष बंडखोरांचाही येथे पराभव झाला.

No comments:

Post a Comment