वेध माझा ऑनलाइन - ‘शिक्षण मंडळ कराड’ या महाराष्ट्रातील ख्यातनाम शिक्षण संस्थेच्या ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी होणारी निवडणूक बिनविरोध पार पडली.
संस्थेच्या घटनेनुसार बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आश्रयदाते व सहाय्यक या प्रवर्गातून प्रत्येकी पाच तसेच सर्वसामान्य प्रवर्गातून तीन अशा १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जेवढी पदे तेवढेच वैध अर्ज शिल्लक राहिल्याने खालील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.
आश्रयदाते प्रवर्ग –
भा. म. तथा बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. माधव कुमठेकर व ऍड. विक्रम कुलकर्णी.
सहाय्यक प्रवर्ग –
अनघा परांडकर, ऍड. अरविंद घाटे, ऍड. बळवंत बुधकर, सुधीर घाटे, डॉ. मीना पेंढारकर.
सर्वसामान्य प्रवर्ग –
राजेंद्र लाटकर, काशिनाथ कुलकर्णी व उदय थोरात हे सदस्य कौन्सिल मेंबर या पदासाठी बिनविरोध निवडून आले.
कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे शिक्षण मंडळाची शताब्दी साधेपणाने साजरी करण्यात आली. आगामी काळात कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर संस्था शताब्दीचा सोहळा दिमाखात साजरा करणार आहे. संस्था स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम अंमलात आणून यापुढेही संस्था सक्षम पायावर वृद्धिंगत करण्यासाठी नूतन सर्व संचालक कार्यरत राहील असे बाळासाहेब कुलकर्णी व चंद्रशेखर देशपांडे, यांनी सांगितले
No comments:
Post a Comment