Friday, January 28, 2022

आता नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार ; ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नाकावाटे बुस्टर डोसच्या ट्रायलला दिली परवानगी...

वेध माझा ऑनलाइन - भारतात सध्या कोरोनाच्या ज्या लशी दिल्या जात आहेत. त्या इंजेक्शनामार्फत दिल्या जात आहेत. आता नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार आहे. भारत बायोटकेच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने  इन्ट्राननेझल बुस्टर डोसच्या ट्रायलला परवानगी दिली आहे.

डीसीजीआयच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने  कंपनीच्या इन्ट्रानेझल कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसच्या ट्रायलसाठी प्राथमिक मंजुरी दिली आहे. भारतातातील ही पहिली अशी लस आहे, जी नाकावाटे  दिली जाईल. या लशीत ओमिक्रॉनसह कोरोनाच्या इतर व्हेरिएंटलाही रोखण्याची क्षमता असल्याचं सांगितलं जातं आहे.
भारतात 10 जानेवारी, 2022 पासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात करण्यात आली. कोरोना योद्धा, हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासोबत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि इतर आजार असलेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जातो आहे.

No comments:

Post a Comment