Tuesday, January 25, 2022

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल ; नवाब मलिक यांची शेलकी टीका... सम्पूर्ण राज्यभरात चर्चा सुरु...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. नवाब मलिक यांनी म्हटले की, एखाद्या चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटात आयटम गर्लची आवश्यकता असते. किरिट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका मलिक यांनी केली.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली होती. या पक्षांच्या काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाईदेखील सुरू केली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीकडूनही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीकडूनही मलिक यांनी भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले होते. अंमली पदार्थ सेवन प्रकरणात मलिक यांनी भाजप नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. 
नांदेड येथे मलिक यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांना अँटमगर्ल संबोधल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment