कराड
येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलावरून हलक्या तीन चार चाकी वाहनांची वाहतूक सुरू होणार असल्याबाबतचे विधान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केले होते मात्र त्यापूर्वी तेथील रस्त्याचे दुतर्फा काम होणे गरजेचे आहे मात्र त्याअगोदरच आज या पुलावरून ही हलकी वाहने जाताना दिसली त्यामुळे या वाहनांना त्या पुलावरून रहृदरीसाठी परवानगी मिळाली आहे का? कोणी दिली ? असा सवाल वेध माझा ने केला होता त्यानंतर लगेचच येथील प्रशासनाने दखल घेत हा रस्ता या वाहनांसाठी त्वरित बंद केला... वेध माझाने ही बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे वेळीच डोळे उघडल्याबद्दल कराडकरांनी वेध माझाला धन्यवादही दिले
जुन्या कोयनापुलाच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच या पुलावरून तीन, चार चाकी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मात्र तोपर्यंतच या पुलावरून ही वाहने ये जा करू लागल्याने या वाहनांना या ठिकाणाहून रहदारीसाठी कोणी परवानगी दिली ? विनापरवानगी हे लोक या पुलावरून वाहतूक करत आहेत का ? अधिकारीवर्गाचे याकडे दुर्लक्ष का होतय ? हा रस्ता वाहतुकीला खुला केला असेल तर अधिकाऱ्यांनी तसे सांगून टाका... आणि नसेल तर मात्र येथील वाहतूक त्वरित थांबवा... असे सांगत वेध माझाच्या वृत्ताने प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले होते वेध माझा ऑनलाइनचा वाचक खूप मोठया प्रमाणात आहे त्यामुळे बातमी वाऱ्यासारखी पसरली या बातमीची सर्वत्र चर्चाही झाली अनेकांकडून याविषयी विचारणादेखील झाली त्यानंतर लगेचच प्रशासनाकडून दखल घेत तो रस्ता व त्याठिकाची वाहतूक त्वरित बंद करण्यात आली एकूणच घडलेल्या या झटपट घडामोडीमुळे वेध माझा ऑनलाइनचे शहर व परिसरातून सर्वत्र कौतुक होताना दिसतंय...कराडकरांनी वेध माझाला धन्यवादही दिलेत...वेध माझाचे अभिनंदनही केलंय...
No comments:
Post a Comment