वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होणार असल्याबाबतचे विधान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केले होते मात्र त्यापूर्वी तेथील रस्त्याचे दुतर्फा काम होणे गरजेचे आहे मात्र त्याअगोदरच आज या पुलावरून हलकी वाहने जाताना दिसली त्यामुळे या वाहनांना त्या पुलावरून रहृदरीसाठी परवानगी मिळाली आहे का? कोणी दिली ? का संबंधित खात्याच्या दुर्लक्षित पणामुळे येथून प्रवास करणे या वाहनधारकांना शक्य झाले का? अशा अनेक चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत
दरम्यान त्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मात्र तोपर्यंतच या पुलावरून हलकी वाहने ये जा करू लागल्याने या वाहनांना या ठिकाणाहून रहदारीसाठी कोणी परवानगी दिली ? का... विनापरवानगी हे लोक या पुलावरून वाहतूक करत आहेत ? याबाबतचा काहीच खुलासा अद्याप झालेला नाही त्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाने याकडे लक्ष देऊन याबाबत योग्य ते सांगणे गरजेचे आहे अन्यथा एकाचे बघून दुसरा असे एका मागोमाग एक गाडी चालक त्याठिकान्हून आपली गाडी विनापरवाना घेऊन जाण्याची प्रक्रिया यापुढेही अशीच चालूच ठेवतील अशी चर्चा आहे तसेच तिथून जर रहृदरीसाठी परवानगी दिली असेलच तर मग तसे संबंधित खात्याने जाहीरही करून टाकावे अशीही चर्चा आहे
No comments:
Post a Comment