वेध माझा ऑनलाइन - तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी आहे सर्वांनी लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड उदयसिंह पाटील यांनी केले.
डिजिटल सभासद नोंदणी अभियानाच्या प्रशिक्षण शिबीर प्रसंगी ते बोलत होते.
उदयसिंह पाटील पूढे म्हणाले,
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा देशपातळीवर व राज्य पातळीवर अतिशय सक्षम नेतृत्व राहिले आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहताना काँग्रेसचा विचार हा घराघरात पोहोचवला पाहिजे. काँग्रेसने कधीही भेदभाव केला नाही. या देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान असून अनेक राष्ट्रपुरुषांच्या त्यागातून हा देश उभा राहिला आहे. मात्र, काही मूठभर लोक आता मनभेद निर्माण करून जनतेमध्ये फुट पाडत आहेत आणि हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
सदर नोंदणी अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजेंद्र शेलार म्हणाले कि, काँग्रेस पक्षामध्ये तरुणांना काम करण्यास मोठी संधी आहे. भाजपने दोन कोटी नोकरी यांसह इतर सर्व खोटी आमिषे दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. तेव्हा प्रत्येकाने अधिक काम करताना काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचविला पाहिजे यासाठीच सभासद नोंदणी अभियान प्रभाविपणे राबविले पाहिजे.
यावेळी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष डॉ सुरेश जाधव, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जि प सदस्य निवासराव थोरात, मंगला गलांडे, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, इंद्रजीत चव्हाण, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण तसेच कराड दक्षिण काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment