वेध माझा ऑनलाइन - राज्यात अचानक कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता अनेक पालक संघटनांनी शाळा सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहे.
एका माध्यम समूहाशी बोलत असताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबद्दल भाष्य केले आहे.
'सोमवारपासून शाळा सुरू करण्यात याव्यात, असा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवणार आहोत. रुग्णसंख्या कमी होत आहे जी सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे पालक सतत शाळा सुरू करा, अशी मागणी करत आहेत. नियम धुडकवून काहीही करणं चुकीचं आहे, पण मुख्यमंत्र्यांचा निर्णय येऊ द्या, अशी सूचक प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली.
तसंच, लसीकरणावर अधिक भर देणार आहोत. आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा करण्यात येईल. शाळेत लसीकरण केंद्र झाले, तर लवकर लसीकरण पूर्ण होईल. रात्रशाळांच्या बाबतीतही निर्णय घेऊ, असंही गायकवाड यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment