Thursday, January 20, 2022

राज्यात गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  46 हजार 197  नव्या रुग्णांची भर झाली असून 37 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 52, 025 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  काल राज्यात कोरोनाच्या  43 हजार 697 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज अडीच हजार रुग्णांची वाढ झाली आहे
 
राज्यात आज 125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात आज  125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  आतापर्यंत 2199 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1144 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात आज 37 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.92 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 67 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे.  सध्या राज्यात 24 लाख 21 हजार 501 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3391 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 27 लाख 45 हजार 348  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

गुरुवारी मुंबईत 5,708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गुरुवारी मुंबईत 5,708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 440 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  मागील २४ तासांत मुंबईत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  सध्या मुंबईतील 44 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 5,708 रुग्णांपैकी 550 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4,795 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणेही नाहीत.  आल्याने 38 हजार 093 बेड्सपैकी केवळ 4,857 बेड वापरात आहेत.  सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 96 टक्के इतका आहे

No comments:

Post a Comment