वेध माझा ऑनलाइन कोरोनाच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. राज्यात आजही 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णाची संख्या वाढत आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मागील काही दिवसांपासून घट पाहायला मिळत आहे. पण राज्याच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. राज्यात आजही 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात 41 हजार 327 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात 40368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाची संख्या 68,00,900 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,19,74,335 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 72,11,810 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,98,414 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2921 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आठ ओमायक्रॉनचे रुग्ण -
आज राज्यात 8 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 1738 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. 932 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
मुंबईकरांना मोठा दिलासा! नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या तिप्पट -
मुंबईतील कोरोना महामारीमुळे वाढणारे रुग्ण आज काही प्रमाणात कमी आढळले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेतील ही रुग्णसंख्या दिलासादायक असल्याने नागरिक आणि पालिका प्रशासनाला दिला मिळाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 7 हजार 895 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 457 झाली आहे. तर 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 92 टक्क्यांवर पोहचला आहे.
No comments:
Post a Comment