Sunday, January 16, 2022

गोव्यातील जनतेला वीज,पाणी शिक्षण मोफत देणार ; गोव्याच्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा अजेंडा जाहीर ; गोव्यात राजकीय हालचालींना वेग...

वेध माझा ऑनलाइन-पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून गोव्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यात व्यस्त असताना आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गोव्यातील जनतेसाठी अनेक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा अजेडा जाहीर केला असून सत्तेत आल्यास गोव्यातील जनतेला मोफत वीज-पाणी पुरवठा करण्यासोबतच इतरही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले, गोव्यातील जनता कंटाळली आहे. गोव्यातील नागरिकांना आता बदल हवा आहे. त्यांच्यासाठी आपण एक नवी आशा आहोत. यापूर्वी त्यांच्याकडे भाजप आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त इतर पर्यायच उपलब्ध नव्हता. पण आता त्यांना बदल हवा आहे. असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी 13 कलमी अजेंडा निश्चित करुन जाहीर केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात मोहल्ला क्लिनिक आणि रुग्णालये सुरू करण्यात येतील. इतकेच नाही तर राज्यातील जनतेला वीज आणि पाणी पुरवठा मोफत दिला जाईल. तसेच सरकारी शाळांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाईल.
अरविंद केजरीवाल म्हणाले, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेला मदत म्हणून 1000 रुपये दिले जातील. त्याचबरोबर राज्यातील पर्यटन क्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधारे उन्नत करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यांची स्थिती सुधारली जाईल. शेतकरी वर्गासोबत बोलून त्यांच्या समस्या सोडवल्या जातील.

No comments:

Post a Comment