वेध माझा ऑनलाइन - येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील सिक्युरिटी फोर्सचे जवान, विविध संस्थांतील विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन केले.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या हस्ते व व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर डॉ. शिनगारे व डॉ. भोसले यांच्यासोबत सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षक आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेटस् कडून मानवंदना स्वीकारली.
याप्रसंगी श्री. विनायक भोसले, सौ. गौरवी अतुल भोसले, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी मुख्य सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शानदार ध्वजसंचलन केले. याप्रसंगी कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण, एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. एस. सी. काळे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. आर. सी. डोईजड, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी पाटील आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment